नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जि प प्रा शाळा शेंबोली (ता मुदखेड) येथे आरक्षणाचे जनक, राज्यर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शिक्षक रामकृष्ण लोखंडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शाहू महाराजांच्या कार्याविषयी सखोल माहिती दिली. त्यांनी समाजातील मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची संकल्पना मांडत शिक्षण व समानतेसाठी दिलेले योगदान अधोरेखित केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शाहू महाराज यांच्या जीवनावर भाषणे, कविता सादरीकरण तसेच सामाजिक समतेवर आधारित नाटिका सादर केली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक न्याय आणि समान संधीबद्दल जागृती निर्माण झाली.
कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने करण्यात आले. .शेवटी मुख्याध्यापक चंपत मुन्नेश्वर यांनी सामाजिक समतेचा संदेश देत, प्रत्येकाने शाहू महाराजांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती मंगला महाजन यांनी परिश्रम घेतले यावेळी केंद्रप्रमुख अरुण अतनुरे पाटील, सुनिता केंद्रे, छाया मठदेवरु, जयश्री गायकवाड, संगीता वादळे, शालेय पोषण आहार प्रमुख गोविंद गोरेवाड व शोभा गोरेवाड विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .