दिव्यांग विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणावे -शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी

शालेयवृत्त सेवा
0

 



सामाजिक न्याय दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांचा सन्मान 


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

राजर्षी शाहू महाराज यांनी राजा असूनही ऋषीप्रमाणे निर्मोही जीवनाचा आदर्श आपणापुढे निर्माण केला आहे. समतेचा एक महान आदर्श म्हणून आपण त्यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा करत असतो. सर्वसामान्य मुलांप्रमाणे दिव्यांग बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे हे शाहू महाराजांना सक्रिय अभिवादन ठरेल असे प्रतिपादन मनपा शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले.


आज महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक.5 लेबर कॉलनी येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज  यांची जयंती साजरी करण्यात आली. आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचा कॅम्प या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. संदीप लबडे, संजय ढवळे, डॉ आशिष योहान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांचा शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे पालक उपस्थित होते. 


या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेळके ताई आणि शाळेचे मुख्याध्यापक सौ रेशमा बाजी यांचे सहकार्य लाभले. या कॅम्पमध्ये सुधीर इंगोले, हनमंत भालेराव, बाबा पठाण, मुख्याध्यापिका रेशमा बेगम, शाळेचे सर्व शिक्षक सबा, आलिया, राहीन कौसर, आणि मराठी माध्यमच्या सौ सुनेपवार यानंतर शाळेचे सेवक रुबी हॅरी फ्रान्सिस, गणेश साडेगावकर, शालेय पोषण आहार मदतनीस उषाताई उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनेपवार आणि राहीन कौसर यांनी केले आणि आभार कीर्ती पुंजपवार यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)