जि प उच्च प्रा शाळा शेंबोली येथे वसंतराव नाईक जयंती साजरी..

शालेयवृत्त सेवा
0



मुदखेड ( शालेय वृत्तसेवा ) :

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेंबोली येथे हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय समितीचे अध्यक्ष बळीराम दुबेवाड यांनी भूषविले.


कार्यक्रमाची सुरुवात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी प्रमुख उपस्थितीत केंद्रप्रमुख अरुण आतनुरे, मुख्याध्यापक चंपत मुनेश्वर, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्याध्यापक श्री. मुनेश्वर यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी शेती आणि ग्रामीण विकासासाठी केलेले योगदान विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असल्याचे सांगितले.


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती सुनीता केंद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन रामकृष्ण लोखंडे सर यांनी केले. यावेळी केंद्रप्रमुख अरुण अतनुरे, छाया मठदेवरु, जयश्री गायकवाड, संगीता वादळे, शालेय पोषण आहार मदतनीस शोभा गोरेवार,गोविंद गोरेवाड व विद्यार्थी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)