तुम्ही शेवटचे निरभ्र निळे आकाश कधी बघितले होते, आठवा ?
80-90 च्या दशकाच्या आधी पावसाळी महिने संपल्यावर सप्टेंबर महिन्यात पांढरे ढग स्पष्ट दिसायचे, तेव्हा एखादा दिवस विजांचा गडगडाटी पाऊस असायचा.
निळे आकाश आणि पांढरे कापसासारखे ढग ही त्या काळात सप्टेंबर महिन्याची पावसाळा ऋतू संपल्याची ओळख होती. White clouds on blue sky was the signature of end of monsoon season.
आज महिना संपत आलाय आणि जणू काही पुन्हा जून - जुलै मध्ये जसा पाऊस पडतो तसा सर्व ठिकाणी पाऊस चालू आहे.
सध्याच्या काळात पावसाळा - हिवाळा - उन्हाळा असे ऋतूचक्रच मुळात राहिलेले नाही.
कधीही पाऊस पडतो, जेव्हा पाऊस नसतो तेव्हा तरी दिवसाचे आकाश स्वच्छ निळे दिसले पाहिजे पण ते धुरकट पांढरे असते.
अति अधिक शहरीकरण, जंगल तोड, डोंगर तोडून रस्ते बनवणे, काँक्रिटीकरण, सर्व बाबतीत होणारे प्रदूषण अशा अनेक कारणांनी निसर्गावरचा मानवी अत्याचार वाढला आहे ज्याला आपण विकास म्हणतो.
ह्याचा परिणाम सर्वात जास्त झाला आहे तो पृथ्वीच्या वातावरणावर.
पृथ्वीचे वातावरण अतिशय गुंतागुंतीचे आणि अनेक ठिकाणी संवेदनशील आहे. याचा अर्थ असा की वातावरणात एका ठिकाणी होणारा बदल हा जरी स्थानिक वाटत असला तरी त्याच्या मुळे संपूर्ण पृथ्वीला एका चेन रिऍक्शन मधून जावे लागते तो वातावरण बदल नॉर्मल करण्या साठी.
असे जर वारंवार घडत गेले तर पृथ्वीचे नॉर्मलाईझ करण्याचे चक्र बिघडू लागते आणि पृथ्वी तीव्र प्रमाणात वातावरण बदल करू लागते, हेच आता सुरु झाले आहे.
---------------
चित्रात सॅटेलाईट color coded मॅप दाखवला आहे ज्यात पाण्याचे बाष्प हिरव्या रंगाचे दिसते.
ढगांची घनता जितकी जास्त तितका रंग गडद होत जातो. म्हणजे गडद रंग तिथे जास्त ढग आहेत आणि हलका रंग तिथे कमी ढग आहेत असे समजा.
त्यानुसार, color codes rough meaning
निळा रंग म्हणजे स्वच्छ / सामान्य आकाश (clear sky)
हिरवा रंग म्हणजे हलके ढग / जास्त प्रमाणात बाष्प (low clouds)
केशरी लाल रंग म्हणजे मध्यम घनतेचे ढग जे पाऊस पाडू शकतात (medium clouds)
गुलाबी-जांभळा रंग म्हणजे तीव्र पाऊस पडणारे अतिवृष्टी करणारे जास्त बाष्प घनता असलेले ढग (heavy dark clouds/thunderstorm)
भारत चित्रात वरच्या बाजूला दाखवला आहे, खालच्या बाजूला आहे अंटार्टिका खंड.
सूर्य नुकताच विषुववृत्त प्रदेश रेषा ओलांडून दक्षिण गोलार्धात गेला आहे त्यामुळे तिथले दिवसाचे तापमान वाढू लागले आहे, उन्हाळा सुरु झाला आहे आणि आपल्या कडे तापमान कमी होऊ लागले आहे म्हणजे हिवाळा सुरु झाला आहे. पण ही झाली थिअरी. प्रत्यक्ष काय वेगळं होत आहे बघा.
दक्षिण ध्रुव अंटार्टिका प्रदेशाच्या वर म्हणजे चित्रात अर्धा भाग ते खाली सर्व ठिकाणी तुम्हाला गडद रंगांची उधळण झालेली दिसते, हे म्हणजे तिथे बनलेली मोठी वादळे आहेत.
ही वादळे सदृश्य स्थिती हिंद महासागर जो थेट अंटार्टिका पर्यंत खाली जातो, त्यात सर्वाधिक मोठी दिसते. ज्याचा आकार ऑस्ट्रेलिया खंडापेक्षाही मोठा आहे असे दिसते.
हेच चित्रात उजव्या बाजूला खाली न्यू झीलँड च्या दक्षिण भागात सुद्धा गडद लालसर भाग दिसतात म्हणजे पॅसिफिक महासागरात सुद्धा हीच वादळी परिस्थिती बनली आहे.
ह्याचा आपल्या इथल्या पावसाशी काय संबंध ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
हेच आहे ग्लोबल वॉर्मिंग चे लोकल दुष्परिणाम चे उदाहरण.
जास्त प्रमाणात निर्माण होणाऱ्या पाण्याच्या वाफेचे प्रवाह हिरवा रंग एखाद्या नदी प्रमाणे उत्तर गोलार्धात खालून वरच्या बाजूला शिरलेला दिसतो.
आफ्रिकेचा पूर्व किनारा आणि ऑस्ट्रेलिया खंडाचा पश्चिम किनारा या दोन्ही भागातून वर जाणारा हिरवा बाष्प वाऱ्यांचा प्रवाह बघा.
हा प्रवाह आहे आपल्या कडील वादळी पाऊस परिस्थितीचे मुख्य इंधन.
हा प्रवाह जो पर्यंत सक्रिय राहील तो पर्यंत आपल्या इथे पाऊस सदृश्य परिस्थिती दर काही दिवसांनी बनतच राहील, पावसाळा ऋतू संपला तरी सुध्दा ढगाळ हवाच राहील. वर सांगितलेल्या प्रमाणे स्वच्छ निळे आकाश दिसणे कमी होईल आणि गेल्या काही वर्षांपासून हे सुरु झाले होते.
हिरवा भाग बाष्प स्थिती ही नवीन ढग बनण्याची पहिली पायरी सारखी आहे त्याला स्थानिक भागात एखादी जरी पोषक परिस्थिती मिळाली तरी ट्रिगर इफेक्ट
प्रमाणे स्थानिक भागात पावसाळी ढग बनू लागतात आणि टाकी लीक झाल्या प्रमाणे भूभागावर जाऊन हे ढग अतिवृष्टी करतात, आणि काही तासात वीरून जातात.
हे चक्र तो पर्यंत सुरु असते जसे वर सांगितल्या प्रमाणे स्थानिक भागात निर्माण झालेली अनियमितता पृथ्वी चे वातावरण दुरुस्त करत नाही तो पर्यंत.
ह्या दुरुस्ती प्रक्रियेत सहारा सारख्या मोठ्या वाळवंटी प्रदेशातून येणारे शुष्क (Dry sand particles) धूलिकण वहन, कोरडी हवा, हिमालयातून खालच्या दिशेत येणारी थंड हवा, बंगालचा उपसागर मध्ये चक्राकार U-turn मारणारा हवेचा प्रवाह असे अनेक स्थानिक घटक एकत्रित काम करतात.
ह्या परिस्थितीला मानवी प्रदूषण एक प्रकारे वातावरणाला झालेली जखम खोदण्याचे काम करत आहे, त्यामुळे जुन्या काळात पावसाळा संपला तर आकाश अनेक महिने स्वच्छ निरभ्र असायचे, व्यवस्थित थंडी पडायची ते सर्व चक्र गेल्या काही वर्षांपासून तुटले आहे.
अनियमित पाऊस, उत्तर गोलार्ध भागात भयकंर थंडी अमेरिकेत ज्याला हिमवादळ Blizzards म्हणतात तसे होणे अशा गोष्टी आता दर वर्षी वाढत गेलेल्या दिसतात.
एक प्रकारे आपण असे म्हणू शकतो की पृथ्वी ही स्वतःला झालेला डॅमेज रिपेअर करण्या साठी अति कठोर पावले उचलत आहे परंतु मानवी प्रदूषण हस्तक्षेप हा डॅमेज जास्त प्रमाणत वाढवत आहे आणि त्या दोन्ही चा एक प्रकारे चढाओढ सायकल प्रमाणे सुरु झाले आहे.
प्रॉब्लम असा आहे की पृथ्वीला ह्या पेक्षाही हजारो पट खराब वातावरण जे डायनोसॉर नष्ट झाल्या च्या वेळी झालेला उल्कापात, महाज्वालामुखी उद्रेक अशा गोष्टी होत्या त्यातून सुद्धा पृथ्वी ने दूषित झालेले वातावरण स्थिर केले, तर आजचे मानवी हस्तक्षेप प्रदूषण हे पृथ्वी साठी छोटेसेच संकट आहे.
पण मानवी जीवनात त्याचे गंभीर दुष्परिणाम अनेक वर्षे भोगावे लागतील ज्यात रोगराई, समुद्राच्या पाण्याची वाढ ज्यामुळे किनारपट्टी शहरे पाण्याखाली जाणे, ओला आणि सुका दुष्काळ, जंगलातील वणवे असे अनेक गोष्टी बघाव्या वाढलेल्या लागणार आहे.
माणूस नष्ट जरी झाला तरी पृथ्वी या सर्वातून काही शे वर्षात पूर्णतः स्वच्छ होईल पण माणसाचे अस्तित्व तेव्हा संपलेले असेल, ज्याची सुरुवात झालेली आहे आणि अशा स्थानिक भागात होणाऱ्या अतिवृष्टी घटना या सर्वांची मानवाला पृथ्वी कडून मिळालेली वॉर्निंग आहे.
-------------
सौजन्य : आकाशातील गमती जमती fb
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .