नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जिजामाता प्राथमिक शाळेचा अभिनव उपक्रम जुलै महिन्यात शालेय मंत्रिमंडळ स्थापन करून विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली त्यामध्ये निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळी खाती वाटप करण्यात आली त्यामध्ये आरोग्य मंत्री म्हणून "कु. सृष्टी बालाजी गजले" हिची निवड झाली आरोग्य मंत्री आपली कामे व्यवस्थितपणे पार पाडत असताना असे लक्षात आले की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या दातांना कीड लागल्याचे दिसून आले तेव्हा विद्यार्थ्यांच्या कृतीवर लक्ष ठेवले असता असे कळले की विद्यार्थ्यांना शाळेत येताना आई-वडील घरून पैसे देतात सोबत आणलेल्या पैशाची मुले मुली चॉकलेट , कुरकुरे , चिप्स खातात आणि त्यातूनच त्यांच्या दातांना कीड लागल्याचे दिसून आले शाळेत येताना लेकरे पैसे घेऊन येतात आणि अनावश्यक खर्च करतात त्यांचे परिणाम त्यांच्या शरीरावर होत असल्याचे दिसून आले ही गोष्ट लक्षात घेऊन आमच्या शाळेने विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत बँकेचे व्यवहार देखील समजणे गरजेचे आहे सोबत त्यांना लहानपणापासूनच पैशाची बचत करणं किती गरजेचा आहे हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे यासाठी आमच्या शाळेने शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी बचत बँक सुरू करण्याचे ठरविले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागेल तसेच बँकेचे व्यवहार व्याज काढणे मुद्दल मुद्दत नफा तोटा हे गणितीय व्यवहार समजण्यास मदत होईल म्हणून आमच्या शाळेतील सहशिक्षिका सौ. आर. एम. भोसले मॅडम यांनी शालेय मिनी बँक सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि सौ के.आर.दरबस्तवार मॅडम यांनी यांनी पालक सभा घेऊन हा विषय सभेत मांडला सर्व पालकांना हा उपक्रम आवडला विद्यार्थ्यांमधूनच मॅनेजर कॅशियर क्लास या पदासाठी विद्यार्थ्यांचे गणिताची 20 मार्काची चाचणी घेण्यात आली त्यामध्ये गुणवत्तेनुसार वरील पदासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली मॅनेजर, कॅशियर, क्लार्क 1, क्लार्क 2, सिक्युरिटी गार्ड म्हणून विद्यार्थीच बँकेचे कामकाज पाहतात.
बचत बँकेत पहिल्याच दिवशी फॉर्म भरून 28 विद्यार्थ्यांनी खाते उघडले आहे त्यांना स्वतंत्र पासबुक देण्यात आले आहे विद्यार्थ्यांच्या बँक व्यवहाराची माहिती स्वतंत्रपणे पासबुक आत व दैनंदिन व्यवहार नोंदवही ठेवली जाते दहा दिवसाच्या कालावधीतच या बचत बँकेचे भाग भांडवल तब्बल 4000 रुपये पेक्षा जास्त झाले आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना बँकेच्या कामकाजाचा आढावा मिळत आहे बचतीचे धडे मिळत आहेत पैसे जमा करणे भरणे काढणे भरणे डिपॉझिट स्लिप भरणे पासबुक अद्यावत करून जमाखर्चाचा तपशील बघणे आधी व्यवहार यांचा अनुभव विद्यार्थी स्वतः घेत आहेत.
या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री देवठाणकर सर, सौ के.जी. हातागळे मॅडम, सौ जे व्हि.जोशी मॅडम, श्री काचावर सर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले संस्थेचे सचिव श्री विलासरावजी पा .कल्याणकर साहेब संस्थेचे अध्यक्ष माननीय मारोतरावजी कल्याणकर साहेब, यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .