मधुकर घायदार यांना राज्यस्तरीय लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार २०२५ प्रदान

शालेयवृत्त सेवा
0

 



( प्रकाश शेटे, अभिनेत्री अलका कुबल यांचेकडून लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार स्वीकारतांना मधुकर घायदार, राजश्री घायदार सोबत सुरेश यादव )


मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

येथील मंत्रालय समोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात मधुकर घायदार यांना या वर्षीच्या लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे, अभिनेत्री अलका कुबल, डॉ. निशिगंधा वाड, सिनेअभिनेते रोहित कोकाटे, क्रांती ग्राम विकास संस्था व विश्वनायक लोकसंसद फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश यादव होते.


           मधुकर घायदार यांना कौशल्य विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, समाजात जनजागृती, नवकल्पक दृष्टीकोन आणि जनसंपर्कातील कार्यतत्परतेमुळे हा सन्मान मिळाला. यावेळी सुहासिनी केकाणे, सुरज भोईर, के. रवी, अन्विता दास, मनोज देसाई, सुरेखा उजगरे आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचे आयोजन मुंबई येथील नेहरू युवा केंद्र (भारत सरकार) संलग्न क्रांती ग्राम विकास संस्था,  बीड येथील विश्वनायक लोकसंसद फाउंडेशन यांनी केले.


             पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रभाकर कोळसे, राजेंद्र लोखंडे, अर्चना भरकाडे, कविता चौधरी, सविता डाखोरे, एस. जी. पाटोदेकर, संध्या सावंत, मेघा पाटील, विद्या वालोकर, डी. जी. पाटील, पांडुरंग दळवी, सी. एच. बिसेन, ललित पाटील, संजय पवार, संगिता पवार, दीपक सोनवणे, डॉ. उदय माळगांवकर यांनी अभिनंदन केले आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)