सुधीर गुठ्ठे यांची नांदेड गटशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

येथील शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर विश्वनाथ गुठ्ठे यांना शासनाने महाराष्ट्र शिक्षण सेवा, उपशिक्षणाधिकारी समकक्ष पदावर पदोन्नती दिली असून त्यांची नियुक्ती नांदेड तालुका गटशिक्षणाधिकारी या पदावर करण्यात आली आहे.


शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गटब मधील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत ३३ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत पात्र ठरलेल्या अधिकाऱ्यांना ही पदोन्नती मंजूर करण्यात आली आहे. 


शासनाच्या आदेशानुसार या अधिकाऱ्यांना एस-१७(४७,६०० १,५१,१००) या वेतनश्रेणीत उपशिक्षणाधिकारी, ज गटशिक्षणाधिकारी, अधीक्षक आणि शिक्षण उपसंचालक अशा विविध पदांवर नेमणूक देण्यात आली आहे. या पदोन्नतींमध्ये पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोकण, नांदेड, सोलापूर, जालना, भंडारा, बुलडाणा आणि रत्नागिरी या विभागांतील अधिकारी समाविष्ट आहेत. तथापि, या पदोन्नत्या सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुज्ञा याचिका क्र. २८३०६/२०१७, तसेच उच्च न्यायालय आणि प्रशासकीय न्यायाधिकरणात प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या अधीन राहून दिल्या गेल्या आहेत. पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करून नव्या पदावर रुजू होण्यासाठी परवानगी द्यावी. तसेच रुजू झाल्याचा अहवाल शिक्षण आयुक्तांकडे सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)