१६ मार्च २०२६ ते दि. २२ मार्च २०२६"ग्वाला" शिर्षकांतर्गत चित्र प्रदर्शन !
नांदेड / श्रीक्षेत्रमाहूर ( शालेय वृत्तसेवा ) :
श्रीक्षेत्र माहूर हे जसे धार्मिक तथा पौराणिक क्षेत्र म्हणून जगाला परिचित असून सध्या काही काळापासून माहूर शहरातील प्रख्यात चित्रकार रणजीत दत्त वर्मा यांच्यामुळे माहूरचे नाव सांस्कृतिक क्षेत्रात आपला तसा उमटवत असून त्यांचे जगप्रसिद्ध जहांगीर कला दालन मुंबई येथे येत्या दि. १६ मार्च २०२६ ते दि. २२ मार्च २०२६"ग्वाला" शिर्षकांतर्गत चित्र प्रदर्शन होत असून त्याचे उद्घाटन दि. १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र राज्याचे आय. टी. तथा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिषजी शेलार यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास किनवट / माहूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम तथा बडनेरा विधानसभा क्षेत्राचे आमदार रवी राणा, अजोयकांत रुईया चेअरमन, ऑल स्टेट ग्रुप ,सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट आर्कीटेक्चर अँड डिझाईन मुंबईचे माजी विभाग प्रमुख डॉ. गणेश तरतरे , जे. के. अकॅडमी, आर्ट अँड डिझाईन मुंबई चे प्राचार्य सुरेंद्र जगताप, जे. के. अकॅडमी डॉईंग अँड पेंटींगचे विभाग प्रमुख तथा किनवट / माहूर विधानसभा क्षेत्रातील मूळ निवासी प्रसिद्ध चित्रकार बालाजी उबाळे यांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे.
" ग्वाला' या शिर्षकांर्तगत ग्रामीण भागातील प्रसिद्ध चित्रकार रणजीत दत्त वर्मा यांनी चित्र मालिका तयार केली असून ती ग्वाला या व्यक्तिरेखे भोवती फिरत असते. विवीध विषय, भाव-भावनांचा आविष्कार, सामाजिक आशय, सौंदर्यशास्त्र त्यांच्या चित्र शैली मधून साकारत कलात्मक आणि कल्पकतेचा आविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे. आयोजक वर्मा यांनी रसिकांनी या प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन केले आहे.
माहूर नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, माहूर तहसिलदार डॉ. अभिजीत जगताप, गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार, नगरसेवक गोपू महामुने, सामाजिक कार्यकर्ते अनिल वाघमारे, सुरेश गि-है, म.रा.शि. प.चे माहुर तालुकाध्यक्ष शेषराव संभाजीराव पाटील, शिक्षक भारती तालुकाध्यक्ष अरविंद जाधव, म.रा. शि प.चे जिल्हा सरचिटणीस जितेंद्र वर्मा, चित्रकार शरद तरडे पुणे, राम ओंकार दिल्ली, श्री आर्ट कला वर्गाचे संचालक सारंग नागठाणे, प्राचार्य, प्रदीप नागतूरे पुसद, प्रा.गजानन बोबडे अकोला, प्रा. उदय भोईर संभाजी नगर ,प्राचार्य एन.डी. अमरावती, डॉ. अरुण धकाते, मिलिंद कंधारे,अजय पोपूलवार, उदय जयस्वाल, सुरेश आराध्ये, जावेद पेंटर माहूर विजय सूर्यवंशी कळमनुरी, अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष रमेश मुनेश्वर यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .