यवताळ जिल्ह्यातील नक्षलग्रस्त/आदिवासी क्षेञातील शिक्षक कर्मचाऱ्यांना मॅट्रिक्स एस-13 ऐवजी एस-14 वेतनश्रेणी द्यावी..

शालेयवृत्त सेवा
0

 


यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाची मागणी !


यवतमाळ ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्ह्यातील नक्षलग्रस्त/आदिवासी क्षेञातील शिक्षक कर्मचाऱ्यांना मॅट्रिक्स एस-13 ऐवजी एस-14 वेतनश्रेणी संदर्भात.. मुख्यकार्यकारी अधिकारी मा.मंदार पत्की साहेब यांची ग्रेट घेऊन निवेदन दिले. मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे शिक्षण विभागाला निर्देश दिले आहे.


                 आज दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जिल्हाध्यक्ष मा.राजुदास जाधव सर यांचे मार्गदर्शनात जिल्हाकार्याध्यक्ष आसाराम चव्हाण यांचे नेतृत्वात शिष्टमंडळाने मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट घेवून नाशिक व चंद्रपूर जिल्हा परिषद प्रमाणे मॅट्रिक्स एस-13 रूपये 35400 -112400 ऐवजी एस -14 रूपये 38600 -122800 वेतनश्रेणी तात्काळ यवतमाळ जिल्हा परीषदेने लागू करून थकबाकी अदा करण्यासंदर्भात निवेदन देवून चर्चा केली.


            मा.मंदार पत्की साहेब यांनी निवेदनाची दखल घेत शिक्षण विभागाला टिप्पणी टाकून लेखाविभागाकडे प्रस्ताव तात्काळ टाकण्याचे निर्देश आमच्या समक्ष दिले. शिक्षण विभागाचे संबधित बाबू मा.मोरेश्वर भोयर यांनी तात्काळ कार्यवाहीला सुरूवात केली आहे.त्यांचे सहकार्य नेहमीच सकारात्मक राहीलेले आहे. यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील नक्षलग्रस्त/आदिवासी क्षेञातील शिक्षकांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे.


         एकस्तर वेतनश्रेणी,चटईक्षेत्र (आतिरीक्त घरभाडे भत्ता) याप्रमाणेच याही विषयाचे पाठपुरावा करून शिक्षकांना जोपर्यंत आर्थिक लाभ होत नाही तोपर्यंत य.जि.प.प्राथ.शिक्षक संघ र.नं.२३५ स्वस्थ बसणार नाही. थकबाकीच्या स्वरूपात लाखो रूपयाचे आर्थिक लाभ शिक्षकांना मिळणार आहे.

               याप्रसंगी शिष्टमंडळात मा.शशिकांत खडसे,मनिष नाकतोडे,नागेश वाघमारे,महेश औतकर,महेंद्र खडसे,संजय सोनकुसरे,अमोल चव्हाण, प्रकाश उपलेंचवार यांचेसह संघटनेचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

  

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)