विकसित भारतासाठी युवकांनी 'माय भारत' पोर्टलवर नोंदणी करावी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

शालेयवृत्त सेवा
0

 



विकसित भारतासाठी युवकांनी 'माय भारत' पोर्टलवर नोंदणी करावी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले  


नांदेड दि. 6 जुलै :- विकसित भारताच्या निर्मितीसाठी युवकांनी 'माय भारत' mybharat.gov.in पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. माय भारत केंद्र आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. 


बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा कौशल्य अधिकारी श्रीपाद परळीकर, जिल्हा युवा अधिकारी अश्नी कानकटे, एनएसएसचे संचालक डॉ. मारोती गायकवाड, जिल्हा उद्योग केंद्राचे सतिश चव्हाण, शिक्षण विभागाचे ए. व्ही. गंजेवार, जिल्हा क्रीडा कार्यालय बालाजी शिरसीकर तसेच विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. 


यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सूचना दिल्या. नशामुक्ती, रस्ता सुरक्षा अभियान, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयक प्रशिक्षणाचे आयोजन करून युवकांसाठी प्रभावी उपक्रम राबविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच एनएसएस, एनसीसी आणि माय भारत यांच्या संयुक्त प्रयत्नातून युवकांसाठी व्यापक व प्रभावी वार्षिक उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते माय भारत पोर्टल नोंदणी अभियानाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. जिल्हा युवा अधिकारी अश्नी कानकटे यांनी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आराखडा सादरीकरणाद्वारे मांडला. तसेच युवकांनी मोठ्या संख्येने माय भारत पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले.

00000

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)