ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना मानधनासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

शालेयवृत्त सेवा
0



मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

 ‘राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजने’ अंतर्गत कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असणाऱ्या १०० ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रति महिना रू. ५०००/- मानधन देण्यात येते. यासाठी पात्र लाभार्थीना १ ते ३१ जुलैपर्यंत ‘आपले सरकार पोर्टल’वर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहरच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांनी केले आहे. 


लाभार्थीचे वय ५० वर्षापेक्षा जास्त असावे. दिव्यांगांना वयाची अट १० वर्षाने शिथिल आहे. कला व साहित्य क्षेत्रात योगदान कमीत कमी १५ वर्षे असावे. वयाने ज्येष्ठ असणारे विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग कलाकारांना प्राधान्य राहील. कलाकारांचे वार्षिक उत्पन्न ६० हजारापेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजिवीका फक्त कलेवरच अवलंबून आहे. त्यांना कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार पात्र राहतील. ते केंद्र व राज्य शासनाच्या महामंडळ व कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्गत नसावेत. कलाकार महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.


अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पति-पत्नी एकत्रित फोटो (लागू असल्यास), बँक पासबुक, अपंगत्व दाखला (लागू असल्यास) राज्य व केंद्र सरकारचे प्रमाणपत्र (लागू असल्यास), नामांकित संस्था, व्यक्ती यांचे शिफारसपत्र (लागू असल्यास) यासह विविध पुरावे, आदी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)