लोक सेवेच्या माध्यमातून समाज प्रबोधन घडविणारे लोकशाहीर.......।

शालेयवृत्त सेवा
0



 [ कॉम्रेड  अण्णाभाऊ साठे आणि त्यांचे साहित्य आज एक ऑगस्ट 2026 अण्णाभाऊंची106 जयंती.... अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दत्तात्रय पांडुरंग मानुगडे यांच्या लिखाणातून सुटणारा हा लेख... - संपादक ]


         अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1920 साली वाटेगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव वालुबाई वडिलांचे नाव भाऊराव शिदोजी साठे. शिक्षण फक्त दीड दिवस व अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यू 18 जुलै 1969 मुंबई येथे झाला. अण्णाभाऊ साठे यांनी 1943 साली साताऱ्याची तरा हा पहिला पोवाडा लिहिला. 1964 ला सर्विस निमित्त पायी चालत मुंबईला गेले. 1968 ला त्यांचे भाऊ शंकर साठे यांना शेवटचा पेन दिला. 1945 ते 47 या दोन वर्षात अकलेचा कांदा या तमाशाचे दोनशेहून अधिक महाराष्ट्रभर कार्यक्रम झाले....।


... त्यांचे मी वाचलेले एकूण साहित्य 35 कादंबऱ्या 13 कथासंग्रहे.11 वगनाट्य प्रवास वर्णन 01 या साहित्यामधून आम गोरगरिबांचे दुखणे अण्णाभाऊ साठे यांनी अतिशय प्रामाणिकपणे मांडण्याचा फार मोठा उपक्रम केला आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यावर अनेक लोकांनी पीएचडी सुद्धा केली आहे हे नाकारता येत नाही. माकडीचा माळ या त्यांच्या कादंबरीवर आधारित, डोंगरची मैना हा चित्रपट त्याचबरोबर,, फकीरा,, आवडी, अलगुज या कादंबरीवर सुद्धा चित्रपट व टीव्ही सिरीयल सुद्धा प्रसिद्ध झाले आहे. अतिशय गरिबीतून व कष्टमय थरातून अण्णाभाऊ यांनी जीवन जगत असताना साहित्य निर्मिती भरपूर केली आहे हे नाकारता येत नाही.....।


... त्यांच्या पुस्तकातून जी पात्रे उभी केली आहेत ती वास्तव जीवनाशी निगडित अशी आहेत. गरिबाला किती मोठ्या अग्नी दिव्यातून जावे लागते हे चित्र त्यांच्या साहित्यामधून मला दिसून आले. अण्णाभाऊंचं लेखन सरळ साध्या ग्रामीण भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न अण्णाभाऊंनी फार मोठा केला आहे. त्यांच्या कथा कादंबरीतील पात्रे पाठीमागे खानाखुणा ठेवून जातात. वितभर पोटासाठी गोरगरिबांना किती मोठी भ्रमंती करावी लागते असे चित्रसुद्धा स्पष्ट होते. त्यांचे लेखन वास्तव जीवनाशी निगडित आहे त्यांनी समाजातून शब्द भांडवल घेऊन साहित्य निर्मिती केली आहे आणि त्या वेळेचा काळ त्या वेळेचा पाटील इनामदार जसाच्या तसा उभा केला आहे......।


... माझा भाऊ अण्णाभाऊ लेखक शंकर साठे या प्रतिनिधी कथासंग्रहास डॉक्टर एस एस भोसले यांनी प्रस्तावना लिहिली आहे. अण्णाभाऊ यांनी साहित्याची निर्मिती कशी गेली याचे चित्र शंकर साठे यांनी प्रतिनिधी कथा संग्रहामध्ये अतिशय सुंदर लेखन केले आहे. असे लेखणी सम्राट पुन्हा होणार नाहीत एवढे मात्र निश्चित आहे. त्यांची मी वाचलेली काही पुस्तके खालील प्रमाणे..।

फकीरा, आवडी, वैर, पाझर, गजाआड, माझा रशियाचा प्रवास, वैजंता, वारणेच्या खोऱ्यात, अलगुज, माकडीचा माळ, चंदना, वारणेचा वाघ, रानगंगा, विष्णुपंत कुलकर्णी, बिलवरी, कोंबडी चोर, खपऱ्या चोर, खुळवाडी, चिराग नगरीतील भुते, माझी मुंबई, अकलेचा कांदा, डोळे मोडीत राधा चाले, गुऱ्हाळ, निखारा, अहंकार, संघर्ष फुलपाखरू, अग्निदिव्य, रान बोका,


... अमृत, रूपा, नवती, बर बांधा कंजारी, कुरूप, ऊवाम, तारा, आघात, चित्रा, स्वप्नसुंदरी, रानगा, देशभक्त घोटाळे, गजाआड, अलगुज व फकीरा या त्यांच्या कादंबरीवर आधारित मराठी चित्रपट सुद्धा निघाला आहे.अशी एकूण 43 पुस्तके व वर लिहिल्याप्रमाणे काही पुस्तके मी वि स खांडेकर वाचनालय सांगली येथून आणून वाचली आहेत. म्हणूनच मला अण्णाभाऊ साठे कळाले अतिशय विपुल लेखन यामुळे अण्णाभाऊ संपूर्ण जगाला समजले. त्यांची काही पुस्तके वेगवेगळ्या भाषेमध्ये रूपांतरीत केली आहेत अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राचीच नव्हे तर जगाशी नाळ जोडणारा असा फार मोठा साहित्यिक आणि त्याचे साहित्य. नवीन पिढीने वाचून आत्मसात केल्यास गरीबी नक्की काय असते हे तर समजेलच. आणि त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे सुद्धा नवीन तरुण पिढीला समजतील असे मला वाटते. मंडळी पुस्तके किती लिहिली यापेक्षा लिहिलेली पुस्तके किती लोकांनी वाचली हा फार महत्त्वाचा विषय आहे.....।


... आत्तापर्यंत म्हणजे 1966 पासून जे काय वाचले ते अजून माझ्या स्मरणशक्ती मध्ये आहे एवढे मात्र निश्चित. अण्णाभाऊ यांच्या एका कथेवरून अनेक कादंबऱ्या निर्माण होतील इतके सुंदर विवेचन करणारे लेखन पुन्हा पुन्हा वाचावे असे वाटते. काही लेखकांनी स्वतःची परिस्थिती याचे भांडवल केले आहे परंतु हे चुकीचे आहे असे त्यांना का वाटत नाही. अण्णाभाऊ साठे यांनी स्वतःची परिस्थिती व गरीबी याचा उल्लेख त्यांनी एकाही पुस्तकांमध्ये केला नाही याचा मला फार मोठा अभिमान आहे. अण्णाभाऊ साठे व त्यांच्या घरातील सर्व माणसे रिझर्वेशन करून मुंबईला गेली नाहीत वाटेत काम धंदा करून त्यांनी मुंबई जवळ केली होती. गरिबाला किती मोठा त्रास असतो हे चित्र तर स्पष्ट होतेच तरीपण कर्तृत्वाची जाणीव पुन्हा पुन्हा आठवण करून देते. हे अण्णाभाऊंच्या साहित्याचे शास्त्र आणि शस्त्र आहे असे मला वाटते.....।


... अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मला मातंग समाज सतभावना मित्र मंडळ औरंगाबाद. या संस्थेमार्फत मला माझ्या साहित्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार. 29 ऑगस्ट 2003 ला नामदार लक्ष्मण रावजी ढोबळे उच्च तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते देऊन माझा गौरव करण्यात आला होता. नामदार लक्ष्मणराव ढोबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे भरपूर साहित्य वाचले आहे. असे त्यांच्या भाषणावरून मला मला समजले पुरस्कार तर प्रेरणा देतात व पुढील लेखन कार्यास शुभेच्छा देतात ही तर अभिमानाची गोष्ट आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रत्येक पुस्तकातील महत्त्वाचा विषय नामदार लक्ष्मणराव ढोबळे यांनी त्यांच्या भाषणातून मांडला होता. त्यावेळी या संस्थेचे अध्यक्ष म्हणून दशरथ मानवतकर सचिव प्रा. बी आर परसकर, आणि पुरस्कार समितीचे प्रमुख संयोजक बाळकृष्ण गवई हे होते. अण्णाभाऊ साठे या नावाचा पुरस्कार महाराष्ट्र मध्ये ठराविक लोकांना मिळाला आहे त्यापैकी मी एक आहे....।


.... अण्णाभाऊंच्या वर लिहावे तेवढे थोडे आहे विपुल लेखन समाजाचे दुखणं समाजाची बांधिलकी आणि पुरोगामी विचार हे अण्णाभाऊंच्या अंगी रुजलेले होते. त्यांचे वर्णन या एका लेख मध्ये पूर्ण होतच नाही तरीपण मी थोडा प्रयत्न केला आहे हल्ली महाराष्ट्र शासनाने दोन भागांमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण चरित्र कथा कादंबरी. प्रकाशित करून फार मोठे सुंदर कार्य केले आहे अण्णाभाऊंची पुस्तके तळागाळापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने योग्य पाऊल उचलावे असे मला वाटते. नवीन तरुण पिढीला अण्णाभाऊ कोण होते हे चटकन समजण्यासाठी ही दोन पुस्तके संदर्भ ग्रंथासाठी प्रकाशित केली आहेत. ती दोन पुस्तके प्रत्येक तरुण पिढीने वाचावीत तरच अण्णाभाऊ साठे समजतील असे माझे मत आहे. दुसरी एक खेदाची गोष्ट म्हणजे वाटेगाव मध्ये गेल्या वर्षी मी पाहिले फकीरा या व्यक्तीची समाधी दारामध्ये गटारीच्या शेजारी बांधली आहे. हे पाहून मनाला फार दुःख झाले इतका मोठा फकीरा जगामध्ये त्याचे नाव झाले. अशा लढव इ एका मोठ्या माणसाची समाधी त्याची ती काय अवस्था याकडे सुद्धा महाराष्ट्र शासनाने लक्ष दिले पाहिजे. मंडळी,,, फकीरा,,, हा कोण आहे हे तुम्हाला माहित आहे की नाही हे मला माहित नाही पण आज सांगूनच टाकतो फकीरा हा अण्णाभाऊ साठे यांचा मामा आहे. आणि मामाच्या जीवनावर लिहिलेली ही अतिशय मोठ्या दर्जाची कादंबरी होय....।



- दत्तात्रय पांडुरंग मानुगडे

( प्रसिद्ध साहित्यिक सातारा )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)