"ग्रामपंचायत पाटोदा(खु.) चा अनोखा उपक्रम, जिल्हा परिषद शिक्षकांचा केला सन्मान!"

शालेयवृत्त सेवा
0



किनवट ( शालेय वृत्तसेवा ) :

 "शिक्षक दिना "निमित्त, ग्रामपंचायत पाटोदा(खु.) चे सरपंच, उपसरपंच, सदस्य, शा. व्य. समितीचे अध्यक्ष व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी शाळेतील शिक्षकांचे शाल, श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.


. या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच ताई श्रीमती सुनीता दत्ता धुमाळे, उपसरपंच श्रीमती सुरोशे ताई व ग्रा. प. सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. गणपतराव उघडे यांनी केले.समाजसेवक श्री.गोपीनाथ बुलबुले यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, आज इंग्रजी शाळेच्या स्पर्धेत पाटोदा(खु.)जि. प. शाळेतील शिक्षकांनी गुणवत्ता टिकून ठेवली. शिक्षकांचे स्थान अति उच्च दर्जाचे आहे. त्यांनी असेच आपले कार्य मोठ्या उत्साहाने व जोमाने चालू ठेवावे.


.  शाळेतील मुला-मुलीनी आपल्या भाषणातून शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना श्री. गणपतराव उघडे यांनी, शिक्षक हा मुलांना स्वतः च्या पायावर उभे राहून देशाची व समाजाची सेवा करण्यास योग्य बनवितात. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन केले.

. या शाळेतील मुख्याध्यपक श्री. मुकुंदा अभंगे व सर्व शिक्षक श्री. विनोद राठोड, श्री. बाळासाहेब तिडके, श्री. बाबू मुंडकर, श्री. सचिन जाधव, श्रीमती सुजाता धनपलवार व श्रीमती अनुसया जाधव यांचा सन्मान करण्यात आला.

तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री.नागोराव टेळके,श्री. दत्ता धुमाळे, श्री. प्रशांत खरे,श्री. आशिष सुरोशे व पत्रकार श्री. मंगिलाल राठोड, अंगणवाडी ताई श्रीमती शिरपूरे व सुरेखा भवरे ताई उपस्थित होते.

.  कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतांनी करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)