राज्यात ४४८४ शिक्षकांची 'आयडॉल' म्हणून निवड..

शालेयवृत्त सेवा
0



पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील चार हजार४८४ शिक्षकांनी शिक्षक म्हणून मान मिळवला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत ही यादी घोषित करण्यात आले यात जिल्हा परिषद महापालिका आणि अनुदानित व अंशतः अनुदानित शाळातील शिक्षकांचा समावेश आहे.


महाराष्ट्रातील आयडॉल शिक्षक :

अहिल्यानगर - 237 

अकोला - 69 

अमरावती - 111 

बीड - 119 

भंडारा - 35 

बुलढाणा - 70 

चंद्रपूर - 244 

छत्रपती संभाजीनगर - 144 

धाराशिव - 92 

धुळे - 53

गडचिरोली - 49 

गोंदिया - 46 

हिंगोली - 52 

जळगाव - 73

जालना - 109 

कोल्हापूर - 151 

लातूर - 135 

मुंबई ( BMC ) - 123 

मुंबई ( DYD ) - 11 

नागपूर - 109 

नांदेड - 89 

नंदुरबार - 25 

नाशिक - 245 

पालघर - 71 

परभणी - 17 

पुणे - 487

रायगड - 144 

रत्नागिरी - 171 

सातारा - 226 

सिंधुदुर्ग - 174 

सोलापूर - 260 

ठाणे - 170 

वर्धा - 135 

वाशिम - 16 

यवतमाळ - 117



आयडॉल शिक्षकांच्या कार्याबाबत यंत्रणेची भूमिका :


1. प्रशिक्षणाकरीता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व अन्य संस्थांना या आयडॉल शिक्षकांना मास्टर ट्रेनर म्हणून घ्यावे.

2.आयडॉल शिक्षक यांचे कामाचे चित्रिकरण, दस्त/अभिलेख इ. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी वेळोवेळी करावे. (उदा. ऑडियो, व्हिडिओ, टेक्स्ट तयार करणे व संकेतस्थळावर प्रकाशित करणे.

3. शिक्षण परिषदांमध्ये आयडॉल शिक्षकांच्या नाविण्यपूर्ण / विशेष कार्याचा प्रचार-प्रसार करावा.

4.संबंधित आयडॉल शिक्षकांचा समितीच्या बैठकामध्ये सन्मान करणे त्यांच्या कार्याचा लेखा-जोखा इ. बाबत तालुका/जिल्हा/विभाग स्तरावरील विद्यार्थी गुणवत्तेच्या विविध समित्यामध्ये या बाबत विचार - विमर्श करणे.

5.गट संमेलन/केंद्र संमेलन यामध्ये आयडॉल शिक्षकांचे उद्बोधन ठेवणे.

6. आयडॉल शिक्षकांच्या उत्तम कार्याचा प्रचार प्रसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी करावी. सर्वोत्तम दर्जाच्या शिक्षकांच्या शाळांना इतर शाळांमधील शिक्षकांनी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य इत्यादींनी भेटी देणे, अधिकारी यांच्या भेटीचे नियोजन करणे.


महाराष्ट्रातील आयडॉल शिक्षकांची यादी येथे पाहू शकता -

Idol Teachers Directory (2026-27)

आयडॉल शिक्षक २०२६-२७ (Idol Teachers Search)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERT)

Showing: 0 teachers
Sr No (क्र) Teacher Name (शिक्षक नाव) School & Address (शाळेचे नाव व पत्ता) Designation (हुद्दा) District (जिल्हा) Taluka (तालुका) Cluster (केन्द्र)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)