२७ जानेवारी : शाळा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सुचना..

शालेयवृत्त सेवा
0

 



मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :
राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरु झाले असून आता येत्या 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु होणार आहेत. शाळा सुरु करण्यापूर्वी शासनाने मार्गदर्शक सुचना केल्या आहेत.

इयत्ता ५,६,७,८ वर्ग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सुचना..
◾वर्ग निर्जंतुकीकरण करवून घेणे (ग्रा.पं.तर्फे किंवा स्वतःऔषध आणून)
◾दररोज शिक्षक,विद्यार्थी, कर्मचारी यांची ताप मोजण्यासाठी थर्मल गन खरेदी करणे. [समग्र अनुदानातून]
◾ऑक्सिमीटर खरेदी करणे [समग्र अनुदानातून]...ऑक्सिजन पातळी मोजण्यासाठी
◾मास्क मुलांना खरेदी करणे, सँनिटायझर खरेदी करणे[समग्र अनुदानातून]
◾ हात धुण्यासाठी पाणी, नळ,साबण उपलब्ध ठेवणे.
◾ ५,६,७,८वर्गांना विषय वा शिष्यवृत्ती शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांनी RTPCR ही कोरोना चाचणी करवून घेणे, प्रमाणपत्र शाळेत ठेवणे.
◾ कुठल्याही परिस्थितीत शाळेत हजर शिक्षक व विद्यार्थी मास्क वापरतील...मास्क न वापरणाऱ्यांची गंभीर नोंद घेतली जाईल...
◾ शाळेत प्रत्येकी २विद्यार्थ्यांमध्ये ६फूट अंतर असेल. शिक्षक,विद्यार्थी अंतरही ६फूट असेल... जमिनीवर वर्तुळे/चौकोन काढून त्यामध्ये मुले बसतील... विद्यार्थी जागा दररोज एकच असेल. डेस्क वा बाकांवर झिगझ्याग पद्धतीने६फूट अंतर असेल.
◾ दररोज शिक्षक, विद्यार्थी यांची ताप व ऑक्सिजन मोजून नोंदी घ्याव्यात.
◾परिपाठ होणार नाही. मुले एकत्र येणार नाहीत. शाळेत जेवणार नाहीत. स्वतःच्या वस्तू-वहीपेन, मास्क, पाणी बाटली-एकमेकांना देणार नाहीत.तोंडात, नाकात,डोळ्यांत बोट घालणार नाहीत.
◾शाळा किमान३तास,कमाल४तास भरेल..सकाळी१०ते दुपारी२ही वेळ योग्य असेल.
◾जास्त संख्या असणाऱ्या शाळेत ५०%आज व ५०%उद्या असे विद्यार्थी हजर राहतील...
पालकांचे शाळेत धाडण्यास तयार असल्याबाबत प्रमाणपत्र बंधनकारक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांना शाळेत येता येणार नाही...
◾ मास्क शिवाय शाळेत कुणालाही प्रवेश नसेल...【 जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं!
◾ऑनलाईन वर्ग चालूच राहतील.. शाळेत गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांवर भर द्यावा. ऑनलाईन इतर विषय घ्यावेत.
◾  संदर्भ- १८जानेवारी२०२१,१०नोव्हेंबर,८सप्टेंबर,२९ऑक्टोबर,१७ऑगस्ट,२२जुलै,२४जून,१५जून चे शासन निर्णय पहावेत.शाळेत ठेवावेत...पाळावेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)