किशोर मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी लोगो ची निवड; कृती तोडकर या विद्यार्थिनीच्या कलाकृतीला मान ! शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले कौतूक

शालेयवृत्त सेवा
0

 



शालेय शिक्षणमंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांनी केले कौतूक


मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

किशोरचा सुवर्णमहोत्सवी लोगो तयार करून घेण्याचे ठरताच सर्वात आधी आठवण आली ती मुंबईच्या जे. जे. स्कुलची. किशोरच्या आजवरच्या वाटचालीत या कला महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे योगदान राहिले आहे. ही कल्पना येथील प्राध्यापक श्री. गजानन शेपाळ यांना सांगितली. 


त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा लोगो तयार करण्यासाठी आम्ही महाविद्यालयात स्पर्धा घेऊ असे सांगितले आणि लगेच स्पर्धा जाहीर पण केली. जवळपास ८० विद्यार्थी यात सहभागी झाले. यातून कृती तोडकर या विद्यार्थिनीच्या लोगोची निवड करण्यात आली.


 सुवर्णमहोत्सवी समारंभात तिला १० हजार रुपयांचे बक्षीस देऊन मा. शालेय शिक्षणमंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)