जि. प. कें. प्रा. शा. नूतन भोकरचे स्काऊट्स राज्य पुरस्कार चाचणी शिबीरात सहभागी..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड (नासा येवतीकर ) :

नांदेड येथे 16 फेब्रुवारी 2021 ते दि. 19 फेब्रुवारी 2021 या दरम्यान पार पडलेल्या स्काऊटच्या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबीरात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नूतन भोकर या शाळेचे चार स्काऊट्स आदित्य अविनाश जाधव, आशिष धम्मरत्न वाघमारे, श्रीकांत सायबू अनरवाड आणि सुरज बाबाराव हुरदुके तसेच स्काऊट मास्टर श्रीकांत द. गोरशेटवार यांच्यासह  सहभागी झाले होते.

दरवर्षी हे राज्यस्तरीय चाचणी शिबीर विभागिय स्तरावर होत असते परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच जिल्हास्तरावर म्हणजेच नांदेड भारत स्काऊट्स आणि गाईड्स कार्यालय, नांदेड येथे संपन्न झाले.


या शिबीरात सहभागी स्काऊट्सची लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक अशा तीनही प्रकारची परीक्षा घेऊन त्याच्यातील विविध प्रकारच्या कौशल्यांचे वस्तुनिष्ठपणे मूल्यमापन केले जाते. या शिबिराचे शिबीर प्रमुख म्हणून श्री. डी.एस.करंडे तर परीक्षक म्हणून श्री. पी. एम. कुलकर्णी, श्री. आर. आर. फुलारी, श्री. एच. डी. बेंडे यांनी काम पाहिले. सदरील शाळेचे स्काऊटमास्टर श्रीकांत द. गोरशेटवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील स्काऊट्स दरवर्षी अशा प्रकारच्या शिबीरात सहभागी होत असतात. गतवर्षी नूतन शाळेचे ४ स्काऊट्सनी राज्य पुरस्कारला गवसणी घातली होती तर याही वर्षी ४ स्काऊट्स निश्चितच यशस्वी होतील असा आशावाद श्रीकांत द. गोरशेटवार यांनी बोलून दाखवला. केंद्रप्रमुख श्री बालाजी पडलवाड सदरील शाळेचे मुख्याध्यापक श्री मारोती पट्टेवाड यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)