लोकशाहीचे खरे शिल्पकार - छत्रपती शिवाजी राजे

शालेयवृत्त सेवा
0

  



                 सोळाव्या शतकात शिवरायांनी खरी लोकशाही निर्माण केली. स्वातंत्र्य,समता, बंधुता व सामाजिक न्याय हा त्यांच्या स्वराज्याचा पाया होता.म्हणून शिवराय  लोकशाहीचे खरे शिल्पकार आहेत.जगात प्रथम स्वातंत्र्याची संकल्पना स्वराज्याच्या रुपाने शिवरायांनी मांडली.म्हणून स्वराज्य, स्वातंत्र्याचे खरे जनक शिवराय हेच आहेत.


        शिवरायांनी मराठी मुलुखात प्राण फुकंला मराठी रयत खचली होती. गांजली होती.यवनाच्या पुढयात त्यांनी माना टाकल्या होता. या तून आपल्याला देवच वाचवेल हा अंधविश्वास निर्माण झाला होता. आत्मविश्वास पिचलेल्या मराठी मनगटात त्यांनी स्फुल्लिंग निर्माण केले.पाठीचा कणा मोडलेल्या समाजास ताट मानेने उभे केले.रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज स्थापण्याची शपथ घेतली. तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले.लोककल्याण कारी राजाने परत माघार हा शब्द उच्चारला नाही.अशक्य, पराजय हे शब्द त्यांच्याकडे नव्हतेच. म्हणूनच स्वराज निर्माण करुन लोकशाही जगात प्रथम निर्माण केली.

                  

              स्वराज्यात सर्व जाती धर्माचे  लोक राहत होते. वतनदारी त्यांनी मोडीत काढली.गुणवत्तेच्या  आधारावर नोकर्‍या दिल्या. लोककल्याण कारी योजना राबविल्या. कामावर आधारित वेतन दिले.शेतकर्‍यांना बियाणे, खते यांचा पुरवठा केला. मौनी बाबा, याकूत बाबा या फकिरांचा सन्मान करत. संत तुकाराम यांना गुरु मानत. अनेक मशिद, मंदिरे त्यांनी बांधली.त्यांचे अष्टप्रधान मंडळ तर लोकशाहीचा सर्वोच मानबिंदु होता. शिवरायांचाया दरबात फक्त माणुस प्रथम स्थानी होता. रयत त्यांनी कुंटुंबाप्रमाणे सांभाळली. म्हणूनच समता हा स्वराज्याचा केंद्रबिंदू होता.

            

                 स्वराज्यात समतेबरोबर बंधुता ही नांदत होती. शिवा काशिद, जीवा महाले,मीर महम्मुंद, काझी हैदर, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे  इ.मावळे राजांसाठी मरायला तयार होते. जगात पहिल्यांदा हे झाले आहे जिथे माणसे मरणासाठी स्पर्धात उतरत होती. मुस्लीम मावळयांना नमाज पटन करता यावे म्हणून प्रथम त्यांनी मशिद बांधली. कुराणाची प्रत सापडल्यावर त्यांनी आदराने मुस्लिम सैनिकाच्या हाती दिली.धर्मांतर झालेल्यांना त्यांनी सन्माने परत धर्मात घेतले.हिरकणीचि साडी चोळी देवून सत्कार केला.जात, पंथ धर्म कधी त्यांनी मानला नाही.स्वराज्यात बंधुता ही नांदत होती.


          राजांचा सामाजिक न्याय जिवंत होता. आजच्या लोकशाहीलाही मार्गदर्शक ठरावा असेच आहे.बलात्कारांचे ,विनयभंगाचे गुन्हे करणार्‍यानां टकमक टोकावरुन कडेलोट होत असे.त्यामुळेस्रीयांना सन्माने वागवले जाई. राजांच्या काळात एकही धार्मिक दंगल झाली नाही. शेतकर्‍यांने कधिच आत्महत्या केल्या नाहीत. बलात्कार ,विनयभंग झाल्याचे ऐकण्यात नाही.सर्वाना विकासाची समान संधी उपलब्ध केली. "सबका साथ, सबका विकास" सोळव्या शतकात राजांनी केला.रयतेचे खरे अच्छे दिन स्वराज्यात होते. म्हणूनच सामाजिक न्यायाची प्रथम सुरुवात शिवरायांच्या काळात झाली.


शिवजयंतीच्या निमित्ताने ही विचारांची  पुष्षमाला त्यांना अर्पण करतो.शिवरायांना मानाचा मुजरा करुन आपणास शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो.जय शिवराय!जय शिवराय!! जय शिवराय!!!


-पंकज राजेंद्र कासार काटकर

सहशिक्षक, जि.प. प्रा.शा.काटी.केंद्र कन्या शाळा काटी

मु.पो.काटी ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद    

भ्रमणभाष्य—९७६४५६१८८१


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)