नासा येवतीकर यांच्या नववे ई बुक कुलदीपकचे ऑनलाईन प्रकाशन संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड (शालेय वृत्तसेवा):

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने साहित्य सेवक समुहात नासा येवतीकर यांचे नववे ई बुक कुलदीपक कथासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. ई साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील सामंत व उदघाटक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक कवयित्री मीना खोंड यांच्या हस्ते कुलदीपक या ई बुकचे ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले.


 प्रसिद्ध स्तंभलेखक अंकुश शिंगाडे, कवी व्यंकटेश काटकर, प्रदीप पाटील, सौ. जयश्री सिरसाटे यांनी शुभेच्छा दिल्या तर याप्रसंगी नांदेडचे प्रसिद्ध व्याख्याते डॉ. हनुमंत भोपाळे, सुंदरसिंग साबळे, प्रीती दबडे, जयश्री सिरसाटे, गणेश साळुंके, आनंद यडपलवार, प्रदीप पाटील, जीवनसिंग खासावत, सविता साळुंखे यांची उपस्थिती होती. पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे,  मराठवाडा विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पांडागळे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश इटलोड, ममता पतपेढीचे चेअरमन रमेश भोसले, सहसचिव बालाजी पेटेकर, गटशिक्षणाधिकारी एल. एन. गोडबोले, केंद्रप्रमुख आबासाहेब उस्केलवार, पदोन्नत मुख्याध्यापक एम. एस. वारले, एम. एन. कागेरू, शिक्षकमित्र माधव हिमगिरे, उदयकुमार शिल्लारे, क्रांती बुद्धेवार, साईनाथ सायबलू, किरण रणवीरकर, नंदकुमार राजमल्ले, अशोक इलतेपोड आदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)