नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
पंचायत समिती, लोहा येथील कापशी विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी के के . फटाले यांनी ग्रामीण रुग्णालय, लोहा येथे नुकतीच कोविड-19 ची लस घेतली.
ही लस कोरोनावर मात करण्यासाठी कोविड-19 ची लढाई जिंकण्यासाठी सुरक्षित व हिताची असल्याने कापशी विभागा अंतर्गत सर्व शिक्षकांनी लसीकरण करून घ्यावे. लसीकरणासाठी सोबत आधार कार्ड व ओळखपत्र ठेवावे. कोविडच्या त्रिसूत्री नियमांचे काटेकोरपणे पालन करुन राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन या प्रसंगी कापशी विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी के. के . फटाले यांनी केले.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .