नांदेड (शालेय वृत्तसेवा):
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी नांदेड यांना शिक्षकांच्या विविध अडचणी विषयी नुकतेच निवेदन देण्यात आले होते.
त्यात प्राधान्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे शाळा बंद आहेत. पण शिक्षक कर्मचारी मध्ये संभ्रमावस्था होती. त्यासाठी जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना पुरोगामी शिक्षक संघटनेच्यावतीने निवेदन देऊन लॉक डाऊनच्या काळात व शाळा बंद असताना शिक्षकांना शाळेवर जाण्याची आवश्यकता नाही. ज्यांच्याकडे मोबाईल उपलब्ध आहेत अशा विद्यार्थ्यांना वर्क फॉर्म देण्यात यावे. अशी मागणी केली होती.
तात्काळ ती मागणी मान्य करून जिल्हाधिकारी विपिन ईटणकर नांदेड यांनी शिक्षकांना शाळेत जाण्याची गरज नाही असे पत्रक काढले.
त्याबद्दल पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे, राज्य उपाध्यक्ष जी.एस. मंगनाळे ,जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे, शिव शंकर पाटील सोमवंशी, जिल्हा प्रमुख सल्लागार बी टी केंद्रे, अशोक मोरे, बळीराम फाजगे, विनायक कल्याण कस्तुरे ,जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश मोकले ,जिल्हाउपाध्यक्ष जी.बी.मोरे,रमेश विभुते, दत्ता मुंडे, कविता गरुडकर, शुभदा पेन्शनवार, सुनंदा कल्याणकस्तुरे,अंजुषा श्रीमंगले वरद मॅडम यांनी कृतज्ञता व्यक्त केली.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .