येलो लाइन कॅम्पेनींग च्या माध्यमातून शाळा तंबाखू मुक्त करा -डॉ हनुमंत पाटील

शालेयवृत्त सेवा
0

      



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

नांदेड शहराच्या लगतच्या 75 शाळा ह्या राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय नांदेड  अंतर्गत महाराष्ट्र आरोग्य विभाग ,प्राथमिक शिक्षण संचनालय पुणे व सलाम मुबंई फाउंडेशन पुरस्कृत उपक्रम तंबाखू मुक्त शाळा साठी आवश्यक 9 नऊ निकष  पूर्ततेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय नांदेड येथे कोरोनाचे सर्व नियम पाळून दोन सत्रात मुख्याध्यापकाची कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेचे उद्घाटन निवासी आरोग्य अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ हनुमंत पाटील मुजळगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.


 प्रमुख पाहुणे म्हणून तंबाखु मुक्त शाळा अभियान जिल्हा परिषद नांदेड जिल्हा समनव्यक रवी ढगे ,नागेश क्यातमवार उपस्थित होते सदरील कार्यशाळा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभागाचे जिल्हा सल्लागार डॉ साईप्रसाद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती सुरवातीला कार्यशाळेच्या चे अध्यक्षस्थानी डॉ हनुमंत पाटील यांचे  स्वागत जिल्हा समन्वयक रवी ढगे यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला कार्यशाळेचे प्रस्ताविक डॉ साईप्रसाद शिंदे यांनी केले यावेळी डॉ पाटील यांनी जिल्हा अधिकारी डॉ विपीन इटनकर ,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर घुगे यांच्या नेतृत्वाखाली  तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नीलकंठ भोसीकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी प्रशांत दिग्रसकर , माध्यमिक शिक्षण अधिकारी माधव सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्ह्यातील निवडक 75 शाळा  काही दिवसात  तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठी सर्व मु अ यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून पाहून शाळा तंबाखू मुक्त करावी.



 प्रमाणपत्र ,गुण,अँप मध्ये भरण्यासाठी नाही तर येणाऱ्या तरुण पिढीला व्यसनमुक्त करण्यासाठी काम करावे येलो लाइन कॅम्पेनींग च्या माध्यमातून शाळा तंबाखू मुक्त करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले नंतर डॉ साईप्रसाद शिंदे यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभागाचे काम ,तंबाखू नियंत्रण कायदा अंमलबजावणी ,तंबाखू मुक्त शाळा साठी आवश्यक नऊ निकष त्यासाठी असणारे गुण व विभागाच्या वतीने तीन निकष पूर्ततेसाठी होणारी मदत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले नंतर रवी ढगे यांनी सलाम मुबंई फाउंडेशन प्राथमिक शिक्षण संचनालय पुणे यांच्या माध्यमातून गेल्या 2009 पासून आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे आता हे अभियान जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळा तंबाखू मुक्त करण्यात येणार आहेत त्या 75 शाळा जिल्ह्यातील इतर सर्व शाळांसाठी आदर्श असणार आहेत हे अभियान राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभाग यांच्या माध्यमातून पुढे नेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले नंतर प्राथमिक  शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व सलाम मुबंई फाउंडेशन च्या टोबॅको फ्री स्कुल अँप डाउनलोड करणे व सर्व निकष  त्यात भरण्याचे प्रात्यक्षिक  या बाबत नागेश क्यातमवार यांनी सखोल मार्गदर्शन केले सदरील कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रम नांदेडचे जिल्हा सल्लागार डॉ साईप्रसाद शिंदे , डॉ उमेश मुंडे ,मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर,वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड  आदींनी परिश्रम घेतले कार्यशाळेचे आभार प्रदर्शन वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)