रवी ढगे यांना राज्यस्तरीय शाळास्नेही बालरक्षक पुरस्कार

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) ; 

स्थलांतरीत मजुर व कामगारांची शाळाबाहय मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे , मारतळा (ता.लोहा ) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांना बालरक्षक प्रतिष्ठाण साटोडा ,ता.जि.वर्धा येथील सेवाभावी संस्थेच्या वतीने राजस्तरीय " शाळास्नेही , बालरक्षक " पुरस्कारासाठी निवड झाली आहे .


      मारतळा प्रशालेतील सहशिक्षक रवी ढगे यांनी सन २०१८ मध्ये विट्टभट्टीवरील कामगारांची दोन शाळाबाहय  (बहिण ,भाऊ ) मुले , तर सन २०१९ मध्ये मारतळा परिसरातील स्थलांतरीत मजुरांची चार मुले शिक्षणापासुन वंचित होती . त्यांना शाळेत प्रवेश देऊ शिक्षणाबद्दल गोडी निर्माण करत .शिक्षणाच्या प्रवाहात आणले , स्वखर्चाने त्यांना शैक्षणिक  साहित्य देत . दररोज शाळेत आपले वाहनातून ने-आण  करत शिक्षणाच्या प्रवाहात आणले . या कार्याची दखल घेत .साटोळा ता.जि.वर्धा येथील बालरक्षक प्रतिष्ठाणने त्यांना राजस्तरीय "शाळास्नेही , बालरक्षक " या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र प्रतिष्ठाणच्या  अध्यक्षा डॉ.राणी खेडीकर यांचे स्वाक्षरीसह नुकतेच प्राप्त झाले आहे . 


सदर सन्मान सोहळा हा मुंबई येथे (ता .३ एप्रिल २०२१ ) होणार आहे. या निवडीबद्दल त्यांचे डायट नांदेड चे प्राचार्य डॉ.रविंद्र अंबेकर , जिल्हाशिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर , गटशिक्षणाधिकारी  रविंद्र सोनटक्के ,  बालरक्षक जिल्हा समनव्यक डॉ दादाराव सिरसाट ,सभापती बालाजी पाटील मारतळेकर , पंचायत समिती सदस्य गणेश पाटील उबाळे , प्राचार्य संजय पाटील , पत्रकार गणेश ढेपे , सरपंच बालाजी बिचेवाड , शालेय समितीचे अध्यक्ष अनुरथ पाटील ढगे , मुख्याध्यापक आनंद दरेगावे यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)