शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरावीत यासाठी उच्च न्यायालयात याचीका दाखल करणार- प्रसाद पाटील

शालेयवृत्त सेवा
0

 


देवगड येथे बळीराम मोरे उत्कृष्ट नेतृत्व पुरस्काराने सन्मानित...


नांदेड (शालेय वृत्तसेवा):

राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वच रिक्त अध्यापक पदे तात्काळ भरावीत अन्यथा याबाबत महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संंघटना लवकरच मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे प्रतिपादन संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केले. 

     देवगड जि. सिंधुदुर्ग संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बळीराम मोरे यांना कै. ल.रा.जाधव उत्कृष्ट नेतृत्व पुरस्काराने येथे नुकतेच सन्मानित केले त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून ते बोलत होते.

     पाटील पुढे म्हणाले, सेवानिवृत्तीमुळे व पदोन्नती मुळे दरवर्षी अध्यापक पदे मोठ्या प्रमाणात रिक्त होत असतात. बालकांच्या मोफत व सक्तिच्या अधिकार कायद्यानुसार शिक्षकांअभावी विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. याची दक्षता शासनाने घ्यावयाची असून गेली 2 वर्षे रिक्त असलेली सुमारे 15 हजार पदे तात्काळ भरावीत यासाठी संघटनेने शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. पण अद्याप भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. येत्या 10 दिवसांत सर्वच रिक्त पदे भरण्यांबाबत शासनाकडून प्रक्रिया सुरू न झाल्यास  संघटनेच्या वतीने याबाबत मे.उच्च न्यायालयात मुंबई येथे याचिका दाखल करून दाद मागणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

      सदर रिक्त पदे 100% भरती केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर टळेलच आणि बदलीमध्ये समानीकरण जागा व विस्थापित शिक्षक असे प्रश्न शिल्लक राहणार नाहीत. तसेच विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विषय शिक्षक पदोन्नतीची पदे लवकरात लवकर भरावीत या मागणीचा पाठपुरावा सुरू असल्याचेही पाटील यांनी सांगितले. 

      महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक  संघटनेचे रत्नागिरी जिल्ह्याचे माजी अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा पतपेढी चे माजी चेअरमन कै ल.रा.जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा या वर्षीचा कै.ल.रा.जाधव उत्कृष्ट नेतृत्व पुरस्कार संघटनचे राज्य कार्याध्यक्ष बळीराम यांना मिळाला.त्यांचे अभिनंदन राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे, राज्य उपाध्यक्ष जी.एस.मंगनाळे बबन बांडागळे, एस के पाटील, दिलीप महाडिक, रूपेश जाधव, प्रकाश पाध्ये आदीने केले.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सचिन जाधव यांनी आभार जिल्हा सरचिटणीस अमित ठाकूर यांनी मानले तर सुत्रसंचलन आनंदराव जाधव यांनी केले.

     यावेळी रंगराव वाडकर, पी आर पाटील, एस के पाटील, द्रोणाचार्य पाटील, श्रीकांत टिपुगडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.अशी माहिती जिल्हा नेते ग.नु.जाधव, जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे, जिल्हा कार्याध्यक्ष विनायक कल्याणकस्तुरे, जिल्हा कोषाध्यक्ष बळीराम फाजगे, जिल्हा प्रमुख सल्लागार बी.टी.केंद्रे, कविता गरुडकर, जिल्हा मुख्य संघटक जी.बी.मोरे, जिल्हा संपर्कप्रमुख सुरेश मोकले यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)