पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने ना .जयंत पाटील आणि ना. धनंजय मुंडे यांना निवेदन

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड (शालेय वृत्तसेवा ):

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने ना . जयंत पाटील पाटबंधारे मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व ना. धनंजय मुंडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री,यांना शिक्षकांच्या प्रलंबीत ऑनलाईन बदल्यां करण्यासाठीनिवेदन देण्यात आले . 


शिक्षकांच्या मागील दोन वर्षापासून कोव्हीड- 19 मुळे आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याच्या रखडल्या आहेत.त्या बदल्या यावर्षी जुलै 2021 अखेर करण्यासाठी ना. हसन मुश्रीफ साहेब ग्राम विकास मंत्री यांना आपल्या स्तरावर विनंती करावी.जेणेकरून संबंध महाराष्ट्रातील शिक्षकांना गेल्या दोन वर्षापासून ज्या अडी-अडचणी निर्माण झाल्या आहेत, बदल्यामुळे अनेकांच्या अडचणी दूर होऊन राज्यातील शिक्षक आनंदी होतील. व आपल्या परिरासोबत राहून कोव्हीड-19 पासून सुरक्षित राहतील. 


निवेदनावर राज्य उपाध्यक्ष जी.एस.मंगनाळे ,जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे ,माहूर तालुकाध्यक्ष एस.एस.पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष जी.बी.मोरे, जिल्हा उपाध्यक्ष एम.डी.पेठकर ,जिल्हा संघटक व्ही .व्ही.आमनवाड ,अर्धापूर तालुका सरचिटणीस माधव बैनवाड ,लोहा तालुका उपाध्यक्ष व्ही.व्ही.नाईक , आदी पदाधिकारी च्या स्वाक्षरी चे निवेदन पुरोगामी शिक्षक संघटना जिल्हा शाखा नांदेड च्या वतिने देण्यात आले . अशी माहिती जिल्हा प्रसिद्धीप्रमुख एस.एस. पाटील ,युसुफ शेख यांनी दिली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)