नांदेड (पोहरे के. पी.) :
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा येथे आज
सातवी उत्तीर्ण झालेल्या मुलांना निरोप देण्यात आला. खरे म्हणजे आयुष्याच्या या वळणावर निरोप द्यावे लागतात आणि निरोप घ्यावे लागतात.आणि ते देत असताना आणि घेत असताना कुणीतरी आणि कधीतरी मनात घर करून जातात... त्या पैकीच काही ही चिमुकली मुले...
आणि त्यांनीच या शाळेत पहिलीला सात वर्ष्यापूर्वी प्रवेश घेला होता आणि आपल्या आईच्या हाताला धरून या शाळेत रडत रडत प्रवेश केला होता आणि आज या शाळेतून जातानाही त्यांच्या डोळ्यातून अश्रू ठिपकत होते..हे आहे त्यांचे शाळेविषयी आणि तेथील शिक्षकांविषयी चे प्रेम त्यांच्यात जो ऋणानुबंध निर्माण झाला होता आणि तो आज पासून काही प्रमाणात कमी होईन म्हणून अश्रू...
मार्च 2020 पासून ब्रेनडेड झालेली शालेय ईमारत ही काही काळ या मुलांकडे बघून अंतर्मुख झाली असणार...
या छोटेखाणी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक
श्री चोंडे एन.एम. यांनी खूप मोलाचा संदेशा दिला.आणि काही काळ ते पण भावुक झाले.
"ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.. पावलो पावली येतील कठिण प्रसंग.
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका...
मुलांच्या प्रतिक्रिया निरोप समारंभात साक्षी जोगदंड,श्रावण जोगदंड, अनुजा जोगदंड, श्रेय्या जोगदंड, विष्णू कदम आणि आत्माराम शिंदे यांनी सुंदर प्रतिक्रिया दिल्या.सर्व प्रतिक्रिया बोलक्या आणि चारोळीच्या रूपात होत्या.
मोखंडपल्ले मॅडम म्हणाल्या की , इंग्रजी विषयाची भीती घालउन
मुलांना त्याची आवड निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या. शाळा ही सतत प्रेरणादायी दायी असतात आणि आमचे विध्यार्थी ही आमची संपत्ती असते."मी एम.ए.ची परीक्षा देताना माझा विध्यार्थी जो की सिनिअर लेक्चर आहे तो माझ्या वर्गावर गार्डिंग ला आला होता ही गोष्ट माझ्यासाठी खूप आनंददायक ठरली.तसेच तुम्हीसुद्धा भविष्यात डॉ.इंजिनियर व्हावे ही सदिच्छा." या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
पांडे मॅडम हया आपल्या मनोगनात म्हणाल्या की ,
"या वर्गातील सर्व मुले अभ्यासू आणि मेहनती आहेत आणि यांचा भविष्यकाळ नक्कीच प्रेरणादायी आहे यात काही शन्काच नाही.सर्वांना शुभेच्छा दिल्या."
रत्नपारखी मॅडम "मी या शाळेत आले आणि येथील विद्यार्थ्यांपासून बऱ्याच काही गोष्टी शिकले.तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात या मुलांनी अगदी कमी वेळेत तयारी करून अतिशय चांगल्या प्रकारे सादरीकरण केले होते.तसेच विज्ञान दिनाच्या दिवशी 28 फेब्रुवारी ला सुद्धा चांगल्या प्रकारे शाळा स्तरावर प्रदर्शन भरवले होते.हे विध्यार्थी आमच्या कायमचे लक्ष्यात राहतील."
या शब्दात आपल्या भावनांशी व्यक्त केल्या.
गंजेवार मॅडम ह्या म्हणाल्या की ,
राजा भोज एक बहुत बड़े दानवीर थे। उनकी ये एक खास बात थी कि जब वो दान देने के लिए हाथ आगे बढ़ाते तो अपनी नज़रें नीचे झुका लेते थे।
ये बात सभी को अजीब लगती थी कि ये राजा कैसे दानवीर हैं। ये दान भी देते हैं और इन्हें शर्म भी आती है।
ये बात जब तुलसीदासजी तक पहुँची तो उन्होंने राजा को चार पंक्तियाँ लिख भेजीं जिसमें लिखा था -
ऐसी देनी देन जु
कित सीखे हो सेन।
ज्यों ज्यों कर ऊँचौ करौ
त्यों त्यों नीचे नैन।।
इसका मतलब था कि राजा तुम ऐसा दान देना कहाँ से सीखे हो? जैसे जैसे तुम्हारे हाथ ऊपर उठते हैं वैसे वैसे तुम्हारी नज़रें तुम्हारे नैन नीचे क्यूँ झुक जाते हैं?
राजा ने इसके बदले में जो जवाब दिया वो जवाब इतना गजब का था कि जिसने भी सुना वो राजा का कायल हो गया।
इतना प्यारा जवाब आज तक किसी ने किसी को नहीं दिया।
राजा ने जवाब में लिखा
देनहार कोई और है
भेजत जो दिन रैन।
लोग भरम हम पर करैं
तासौं नीचे नैन।।
मतलब, देने वाला तो कोई और है वो ईश्वर है वो परमात्मा है वो दिन रात भेज रहा है। परन्तु लोग ये समझते हैं कि मैं दे रहा हूँ राजा दे रहा है। ये सोच कर मुझे शर्म आ जाती है और मेरी आँखें नीचे झुक जाती हैं।
वो ही करता और वो ही करवाता है, क्यों बंदे तू इतराता है,
एक साँस भी नही है तेरे बस की, वो ही सुलाता और वो ही जगाता है...
अतिशय भावुक होऊन त्यांनीच आपली प्रतिक्रिया आणि सुंदर बोधकथेतून व्यक्त केली..
श्री. धोपटे सर केंद्रप्रमुख यांनी बोलतांना म्हणाले की ,
"कृतिशील शाळा,कृतिशील शिक्षक आणि कृतिशील विध्यार्थी असलेल्या शाळेतून सातवी उत्तीर्ण झालेल्या मुलांना आज जो नोरोप देण्यात येतोय तो नक्कीच त्यांच्या चिरकाल लक्ष्यात राहील.या शाळेने, येथील शिक्षकांनी जी मूल्य तुम्हाला दिली आहेत त्याची अशीच जोपासना करा.तुमचा भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल असेल. जवळपास सर्वच मुलांनी अतिशय बोलक्या प्रतिक्रिया दिल्या आणि शिक्षकांविषयी नी या शाळेविषयी आपला स्नेह प्रगट केला.आणि ते ही चारोळीच्या माध्यमातून.यात ऑनलाईन क्लास चा आणि युट्यूब चा वापर करून आपले वक्तृत्व कौश्यल्य विकसित केले खरे म्हणजे ही खूप मोठी बाब आहे."सर्वांना पुढील शैक्षणिक सत्राच्या शुभेच्छा दिल्या.
"बालपणीचे दिवस सुखाचे,
आठवती घडी घडी
आठवणींना आठवणीची,
वाहतो ही शब्दसुमनांची जुडी,
बालपनीचे सखे सोबती,
आठवणींना अजून झोम्बती.
काही गुरुजन काही सवंगडी,
या सर्वांनी विविध गुणांनी,
जशी घडवली तशीच घडली,
आयुष्याची घडी
आणि म्हणूनच
वाहिली ही शब्दसुमनांची जुडी.
सातवीतील विध्यर्थ्याना त्यांचे मार्कमेमो,संचायिका आणि मागील वाटपाटील उरलेली इयत्ता आठवी ची पुस्तके देऊन. तसेच सातवीला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांकडून परीक्षा पॅड आणि पेनी चे वाटप करण्यात आले.तर मुलांनी सुद्धा आपल्या शाळेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि मुलींनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा भेट दिल्या.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्यामराव जोगदंड यांचेही खूप खूप आभार..


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .