शासन आदेशाप्रमाणे शिक्षकांच्या ५० टक्के शाळेत उपस्थितीचे आदेश तात्काळ निर्गमित करणार. . - जि.प.अध्यक्षा मा.सौ.मंगाराणी अंबुलगेकर

शालेयवृत्त सेवा
0

 


शिक्षकांच्या संघटनेस केले आश्वासित..


नांदड ( शालेय वृत्तसेवा ) :

शिक्षण संचालक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या १४ जून २०२१ च्या शासन आदेशाप्रमाणे नांदेड जिल्हयातील इयत्ता १ली ते ९ वी व इयत्ता ११ वीला शिकविणाऱ्या ५०%  टक्के शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहवे याबाबतचे आदेश नांदेड जिप शिक्षण विभागामार्फत तात्काळ निर्गमित केले जातील. या बाबत कोणाही संदेह निर्माण करून घेवू असे सुस्पष्ट आश्वासन नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा.सौ.मंगाराणी सुरेशराव अंबुलगेकर यांनी  इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेच्या संयुक्त शिष्टमंडळाशी चर्चा करताना दिलेले आहे.

             

अखिल अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मा.देविदासराव बसवदे व इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष मा.बालासाहेब लोणे यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त शिष्टमंडळाने नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा.सौ.मंगाराणी अंबुलगेकर यांची त्यांच्या निजी कक्षात भेट घेवून शिक्षण संचालक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या १४ जून २०२१ रोजी एक आदेश काढून कोरोना प्रार्दुभाव वाढू नये यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत  प्रत्यक्ष न बोलविता ऑनलाईन पध्दतीने अध्यापना करावे व कोरोनामुळे ५० टक्के शिक्षकांनीच शाळेत उपस्थिती राहवे. असे आदेश दिलेले असतानाही नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अदयापही शिक्षण संचालकांचे आदेशाप्रमाणे कोविड काळामुळे ५० टक्के शिक्षकांनीच शाळेत उपस्थित राहवे या बाबत अदयाप आदेश निर्गमित केलेले नाहीत. 


रेल्वेसह अन्य सार्वजनिक वाहने पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यामुळे व या संवर्गात मोठया संख्येने असलेल्या महिला शिक्षिकांना याचा कमालीचा शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे शिक्षक संवर्गात कमालीची अस्वस्थता व असंतोष आहे. शिक्षण संचालकांच्या आदेशाप्रमाणे ५० टक्के शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत इतर जिपप्रमाणे  नांदेड जिपच्या शिक्षण विभागानेही तसे  आदेश तात्काळ निर्गमित करावेत, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.

        

यावेळी नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा.सौ.मंगाराणी अंबुलगेकर म्हणाल्या की, शासन आदेशाप्रमाणेच शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थिती बाबतचे आदेशही नांदेड जिपचा शिक्षण विभाग तात्काळ निर्गमित करेनच, त्या बाबत मी आपणास स्पष्ट ग्वाही देते. मस्करीत वा हसी-मज्जाक मध्ये कोणी अधिकारी हलखाफुलखा विनोदाने कांही म्हणाले असेल तर ही बाब फार गांर्भियाने घेवू नये. शासनाच्या आदेशाचे पालन  केले जाईल मी (अध्यक्षा) व शिक्षण सभापती मा.संजयजी बेळगे शिक्षकांच्या न्याय मागणीच्या बाजुनेच आहोत  असे स्पष्ट आश्वासन  अध्यक्षा मा.सौ.मंगाराणी अंबुलगेकरांनी शिष्टमंडळाला दिलेले आहे.

             

सदरील शिष्टमंडळात अखिल अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मा.देविदासराव बसवदे व इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष मा.बालासाहेब लोणे, मा.बबनराव घोडगे, जिल्हाध्यक्ष मा.अशोक पाटील, सरचिटणीस मा.प्रल्हाद राठोड, मा.निलेश गोधने. मा.सुधाकर थडके, मा.माधव कांबळे, मा.रवी ढगे, मा. शिवाजी पाटील, मा.शिवशंकर बोडके यांसह अनेकांचा सहभाग होता.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)