नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागातील पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार येत्या 10 जून पर्यंत भरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी दिली आहे.
कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पदोन्नती संदर्भात विभागवार बैठका घेऊन याद्या तयार करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी आज झालेल्या बैठकीत खातेप्रमुखांना दिले आहे.
यापूर्वी अर्थ व पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आले आहेत. दिनांक 7 मे 2019 च्या शासन परिपत्रकानुसार पदोन्नत्या दिल्या जाणार आहे त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी सर्व विभाग प्रमुख यांच्या बैठका घेऊन नियोजन करत आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पदोन्नती विषयाकडे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी जातीने लक्ष घातल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व विभागातील पदोन्नत्या होणार आहे. विशेषतः शिक्षण, आरोग्य व सामान्य प्रशासन विभागातील पदोन्नत्या मोठ्या प्रमाणावर आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार या पदोन्नत्या देण्यात येणार आहेत. येत्या 10 जून पर्यंत जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या देण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी दिली आहे.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .