नांदेड ( जी. एम. सोनटक्के ) :
जन्म १०मे१९६३ला धारकाना,ता.महागाव,जि.यवतमाळ येथे श्री. लक्ष्मणराव व सौ.लीलावती या मध्यमवर्गीय शेतकरी दांपत्याच्या घरी झाला.
वडिलांना मुलांनी खूप शिकावे,असे वाटे.गावात वा जवळपास शिक्षणाची सोय बऱ्यापैकी नव्हती... म्हणून शिक्षणासाठी परिचित पाहुण्यांच्या गावी हदगावला ते १९७०साली (घर विकत घेऊन) रहायला आले.
त्याकाळातील प्रसिद्ध जिपहा हदगाव शाळेत ते इयत्ता १ली ते१०वी पर्यंत शिकले.
१९८१ला हदगावलाच ते श्री.यशवंत कदम(केंप्र),श्री.बालाजी कनगिरे(केंमुअ),श्री.प्रकाश जाधव(शिविअ,गशिअ),श्री.नंदू कौठेकर(शिविअ),श्री. विजय पालकर(शिविअ) यामित्रमंडळींसोबत डी.एड्.उत्तीर्ण झाले...
२७-१२-१९८३ला जि.प.प्रा.शा. लिंगी ता.किनवट इथून शिक्षकपदाचा श्रीगणेशा केला.【तत्पूर्वी शिवाजी हा.चातारी,ता.उमरखेड येथे दीडदोन वर्षे शिक्षक म्हणून काम केले होते.】मेंढकी,हिवळणी,मुरली, धर्मवाडी इ.ठिकाणी'आपण भले,आपले काम भले' या न्यायाने इमानेइतबारे मुलांना शिकवले.
११-०७-२०००ला प्राथमिक पदवीधरपदी बढतीने हडसनी ता.हदगाव येथे आले..शिक्षणाविषयी अनास्थेचा अघोरी शाप या गावाला आहे.विद्यार्थ्यांच्या ३५-४०% अनुपस्थितीच्या गंभीर संकटाला सामोरे जात त्यांनी इंग्रजीच्या गुणवत्तावाढीसाठी आटोकाट प्रयत्न केले.
ऑक्टोबर२००७मध्ये जि.प.कें.प्रा.शा.ल्याहरी येथे पदोन्नत मुअपदी बढतीने आले.येथे रंगरंगोटी, वर्गदुरुस्ती,कुंपणभिंत बांधकाम इ.बरोबरच गुणवत्ता वाढीमध्ये सहकारी शिक्षकांच्या मदतीने प्रचंड यश मिळवले.त्यामुळे आजूबाजूच्या गावांतील जवळपास२०० विद्यार्थी वाढले.२९०ची पटसंख्या४९०पर्यंत पोचली. शिक्षकांची पदे ७वरून१३पर्यंत वाढली...अभिलेख्यांचा दर्जा ISO मानांकनाच्या दर्जाचा ठेवला...विविध अधिकारी भेटीत व गुणवत्ता अभियानात शाळेचा दर्जा अव्वलच राहिला.मा.मुकाअ परिमलसिंह यांनीसुद्धा भेट देऊन शाळेचे व शिक्षकांचे कौतुक केले.
२०-०५-२०११ला ते बढतीने खडकी ता.हि.नगर येथे केंद्रप्रमुख झाले... शाळांना भरपूर भेटी देणे,गुणवत्ता वाढ करणे यांकडे त्यांचे विशेष लक्ष होते.शाळांचे आर्थिक अभिलेखे तपासून अद्ययावत करण्यावर त्यांचा विशेष भर होता... खडकी येथील केंप्र कार्यालय अतीसुंदर,बोलके केले... त्यानंतर २०१५-१६मध्ये एक वर्ष ल्याहरीचे केंप्र म्हणून काम पाहिले.ल्याहरी केंद्रातील शाळा डिजिटल करण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले.ल्याहरीच्या शिक्षकांनी भरपूर शिक्षकवाटा जमा करून शाळा रंगरंगोटी केली, डिजिटल केली.
स्वमित्र श्री.कौठेकर, श्री.जाधव यांच्यासोबतच २९मे२०१६ ला बढतीने शिक्षण विस्तार अधिकारीपदी बीट-निवघा(ता.हदगाव) येथे रुजू झाले.
पं.स.हदगावची बैठक दु.१वा.असेल तर ते ३-४शाळांना भेट देऊन बैठकीला वेळेवर हजर व्हायचे..इतके ते दररोज शाळाभेटी द्यायचे.. लोकवाटा व शाळा डिजिटल व सुंदर करण्यामध्ये निवघा बीट नेहमीच आघाडीवर राहिले.एक लाख रुपये प्रतिवर्षी फी घेणाऱ्या शाळांपेक्षा अतीसुंदर, टापटीप,ISO दर्जाच्या १५-२०शाळा निवघा बीटमध्ये आहेत... नवोदय,शिष्यवृत्ती परीक्षा,इंग्रजी वाचन यांमध्येही येथील शिक्षकांनी सतत उत्तमच कामगिरी केली...
लॉकडाऊनच्या काळात गृहभेटी,स्वाध्याय पुस्तिका वाटप व तपासणी, ऑनलाईन वर्ग,रंगरंगोटी, फोनसंपर्क,शिक्षकमित्र यांसारख्या उपक्रमांमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली बीटमधील शाळा अव्वल राहिल्या...
निर्व्यसनीपणा,आरोग्यपूर्णता,शाकाहारी राहणे, प्रामाणिकपणा, सरळमार्गीपणा,वक्तशीरपणा, वरिष्ठांचा आदर करण्याची वृत्ती, कर्तव्यतत्परता, सकारात्मकता,
कुणाकडूनही एक रुपयाची अपेक्षा न ठेवणे,चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना सतत प्रोत्साहन देणे,दररोज ३-४शाळांना भेटी देणे, विद्यार्थ्यांच्या मराठी वाचनाबरोबर इंग्रजी वाचनावर भर देणे,तपासणी करून अभिलेखे अद्ययावत ठेवण्यास मदत करणे,सर्वांना समान वागणूक देणे,हेवादावा-आपलंतुपलं न करणे,कुणी अवज्ञा केली तरी द्वेषभावना न बाळगणे-पदाचा दुरुपयोग न करणे,शांतपणे काम करणे,कामाची प्रसिद्धी अजिबात न करणे,साधी राहणी-उच्च विचारसरणी,स्वतःच्या वाहनाने व स्वखर्चाने प्रवास करणे इ.वैशिष्ट्ये त्यांची होती...यामुळे निवघाबीट सतत प्रगतीपथावर राहिले... काही काळ हदगाव बीटचाही अतिरिक्त कारभार त्यांनी पाहिला...
साप्ती शाळा व साप्ती गावाने तर लॉकडाऊन काळातही सर्वोत्तम कामगिरी दाखवत मा.मुकाअ वर्षा ठाकूर यांच्याकडून वाहवा मिळवली, बक्षीस मिळवले...
मा.पावने साहेबांना ३मुली व १मुलगा... मोठी मुलगी रिसोडला एका समृध्द व्यापारी कुटुंबात स्थिरावली आहे. मुलगा उच्च दर्जाच्या सायन हॉस्पिटल,मुंबईमध्ये mbbs झालाय,एक मुलगीneetची तयारी करतेय तर दुसरीiitची.पत्नी ज्योत्स्ना व आई लीलावती यांची उत्तम साथ आहे. हदगावमध्ये दुमजली मोठे घर आहे. जुन्या गावात घर आहे.मूळगावी धारकान्याला थोडी जमीन आहे... अशा रीतीने हे एक अत्यंत सुखी, समाधानी कुटुंब आहे....
एक सामान्य प्राथमिक शिक्षक,प्राथमिक पदवीधर शिक्षक,पदोन्नत मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख ते शिक्षण विस्तार अधिकारी असा चढता आलेख असलेले ते दि.३१-०५-२०२१ला ३७वर्षे५महिने४दिवसांची निष्कलंक,इमानदारीने,काटेकोर नोकरी करून वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. आ.शिविअ पावनेसाहेबांना सेवानिवृतीच्या खूपखूप शुभेच्छा! त्यांना भावी आयुष्य आयुरारोग्यपूर्ण,आनंदी,
सुखसमृद्धीचे व त्यांच्या मनाजोगे जावो,हीच सदिच्छा!


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .