विद्यार्थी आधार कार्ड सरल प्रणालीत नोंदणी अद्यावत करून प्रमाणपत्र सादर करणे बाबत या आदेशाला तात्पुरती स्थगिती अथवा ही अट शिथिल करण्यात यावी- शेख अब्दुल रहीम

शालेयवृत्त सेवा
0

 



शाळा व आधार कार्ड सेंटर बंद असल्याने मुख्याध्यापक व शिक्षकांना येत आहे अडचणी...


औरंगाबाद ( शालेय वृत्तसेवा ) :

विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड सरल प्रणाली मध्ये नोंदणी अद्यावत करून 90 % टक्के असलेले प्रमाणपत्र आपल्या कार्यालयात सादर करण्याकरिता शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी पत्र पारित केलेले आहे व प्रमाणपत्र सादर करण्याची अल्प मुदत दिलेली आहे. 


 सद्या कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शाळा व आधार कार्ड सेंटर बंद आहे. विद्यार्थ्यांचे नावात व आधार कार्ड मध्ये तफावत असल्यामुळे आधार कार्ड अपडेट मध्ये  शिक्षकांना व मुख्याध्यापकांना अडचणी येत आहे. व शासनातर्फे कोरोना ची तिसरी लाट लहान मुलांवर आधरखीत असल्याने सद्या आणि भविष्यात ही आधार दुरुस्ती साठी पालक मनस्थितीत नाही. शाळांना आधार कार्ड नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याकरिता तात्पुरती स्थगिती देण्यात यावी किंवा शाळा पूर्वत सुरू होई पर्यंत मुदत द्यावी ही याबाबत हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा मेयार अससोसिएशन चे मराठवाडा अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सरांनी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांना निवेदन सादर करून विनंती केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)