प्राथमिक शाळा निळा येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( कैलास पोहरे ) :

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा येथे आज दिनांक 05 जून 2021 रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.त्या प्रसंगी बीट निळा च्या शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय सौ.भारती मॅडम, केंद्रीय मुख्याध्यापक श्री निळकंठ चोंडे,प्रा.शिक्षिका श्रीमती गंजेवार मॅडम,श्रीमती रत्नपारखी मॅडम,श्रीमती वाघमारे मॅडम, श्रीमती पांम्पटवर मॅडम, श्रीमती कर्णेवार मॅडम,श्री पोहरे सर हे उपस्थित होते तर शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री श्यामराव मारोतराव जोगदंड,उपाध्यक्ष श्री.किशन बापूराव कदम आणि गिरी महाराज उपस्थित होते.


        आज मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर खूप मोठी प्रगतीच्या केली असली तरी कोरोना विषाणू च्या शक्तिपुढे मानव अजून ही पराभव झाला आहे.निसर्गातून मोफत मिळणाऱ्या प्रणवायू ची काय किंमत आहे ते आज आपणाला कळाले.तसेच आज पाणी सुद्धा आपण आपल्या समोर येणाऱ्या भावी पिढीचे वापरात आहोत.मार्च 2020 ते आज पर्यंत किती तरी जीव प्राण वायू मिळाला नाही म्हणून गेले आहेत.


          म्हणून आज एक मुल एक झाड ही काळाची गरज आहे. नुसते फोटो च लावायचे नाहीत तर त्याचे संगोपन सुद्धा केले पाहिजे असे आदरणीय सौ भारती मॅडम यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)