दिवाळीच्या सुट्टीत घरबसल्या चित्र काढून रंगवा आणि फोटो काढून पाठवा! विजेत्यांना पारितोषिक

शालेयवृत्त सेवा
0



राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा


दिवाळीच्या सुट्टीत घरबसल्या चित्र काढून रंगवा आणि फोटो काढून पाठवा! विजेत्यांना पारितोषिक, बालदिनी निकाल अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५





नाशिक ( शालेय वृत्तसेवा ) :

     शिक्षक ध्येय तर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२५’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांची सुप्त कला राज्यातील इतर विद्यार्थ्यांसमोर आणणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. स्पर्धा आयोजनाचे हे सहावे वर्ष आहे.


     राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. 

गट अ (इयत्ता पहिली ते पाचवी) चे विषय आहेत… (फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे.)

1. फळ  

2. फुल 

3. झाड 

४. घर   


गट ब (इयत्ता सहावी ते दहावी) चे विषय आहेत... (फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे.)

1. माझा आवडता सण  

2. वृक्षारोपण  

3. फुगेवाला 

४. सहल  


गट क (इयत्ता अकरावी ते पदवी)  चे विषय आहेत... (फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे.)

पोस्टर्स स्पर्धा

1. व्यसनमुक्ती जनजागृती

2. प्लास्टिक मुक्त जनजागृती

3. सडक सुरक्षा जनजागृती

४. इंधन बचत जनजागृती


    ऑनलाइन चित्रकला स्पर्धेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी

https://shikshakdhyey.co.in 


https://kaushalyavikas.blogspot.com/2025/09/blog-post_16.html   


या संकेतस्थळांना भेट द्यावी. 


विद्यार्थ्यांनी दिलेल्या चार विषयांपैकी फक्त एकाच विषयावर चित्र काढून त्याला रंग देऊन त्या रंगीत चित्राचा फोटो काढून ९६२३२३७१३५ या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवायचा आहे. अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर आहे.


    तीनही गटातील चित्रांना पारितोषिक दिले जाईल. त्यात सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि प्रिंट प्रशस्तीपत्र (सर्टिफिकेट) यांचा समावेश आहे. चित्रकला स्पर्धेचा निकाल दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी, बालदिनाच्या दिवशी राज्यातील विविध वर्तमानपत्रात जाहीर करण्यात येईल. 


     राज्यातील मुख्याध्यापक व चित्रकला शिक्षक यांनी सकारात्मक विचारसरणी ठेऊन या स्पर्धेत आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन मधुकर घायदार, नाशिक; प्रभाकर कोळसे, वर्धा; डी जी पाटील, नंदुरबार; कांबळे एस. जी. पाटोदेकर, लातूर; सौ. सुरेखा उजगरे, मुंबई; सविता डाखोरे, सोलापूर; विद्या देवळेकर, रत्नागिरी; वसुधा नाईक, पुणे; अर्चना भरकाडे, अमरावती यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)