वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबऊन गौरीचा वाढदिवस साजरा..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :                  

मारतळा!  दिनांक 22 सप्टेंबर 2021 जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा मारतळा येथील उपक्रमशील शिक्षक रवी ढगे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळकी( बु) येथील शिक्षिका  सौ मंगल रवी ढगे  या शिक्षक दाम्पत्याने मागील पाच वर्षांपासून  आपल्या मुलीचा गौरी रवी ढगे हिचा वाढदिवस अनावश्यक खर्च टाळून वेगवेगळे  सामाजिक  उपक्रम राबवून साजरा करण्यात आला .


शाळा बंद पण शिक्षण सुरू अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य  म्हणून पॅड तर   शाळेत वृक्षारोपण करून साजरा केला यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळकी बुद्रुक या शाळेतील मुलांना सुद्धा शैक्षणिक साहित्य व वृक्षारोपण करण्यात आले यावेळी  गौरी रवी ढगे व केन्द्र प्रमुख टी पी पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलांना शैक्षणिक साहित्य म्हणून पॅड देण्यात आले. 


यावेळी शाळेचे मु अ आनंद दरेंगावे, मू अ चक्रधर सर भुजंग येडे सर एस वाय जाधव सर विषय शिक्षक व्यंकट मुगावे , लांडगे , भुरे, आडे, ढेपे सर,उज्वला जोशी मॅडम सौ माधुरी मलदोडे,  जयश्री बारोळे  ,सौ मंगल जीगळे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)