उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विद्या लक्ष्मणराव गंजेवार या शिक्षिकेचा केला सत्कार !
नांदेड ( पोहरे के.पि. )
अनुधावन कार्यक्रमातर्गत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा येथे प्राचार्य रवींद्र आंबेकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड,
शिक्षणाधिकारी प्रशान्त दिग्रसकर जि.प.नांदेड,
शिक्षण विस्तार अधिकारी बीट निळा सौ.भारती मॅडम,
केंद्रप्रमुख श्री धोपटे सर केंद्र निळा, मुख्याध्यापक चोंडे सर के.प्रा.शाळा निळा आणि डायट चे संपूर्ण पथक यांनी आमच्या शाळेतील ऑनलाईन शिक्षणात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विद्या लक्ष्मणराव गंजेवार मॅडम यांचा सत्कार केला.
मॅडम ला अशीच उत्तरोत्तर कार्य करण्याची प्रेरणा मिळो.
सर्वांनी आमच्या शाळेची आणि स्टाफ ची स्तुती केली.
ही आमच्यासाठी उल्लेखनीय बाब आहे. ग्रामपंचायत कार्यालय निळा तर्फे शाळेचे मैदान सपाटी करण करण्याच्या कार्यास ही आज सुरुवात करण्यात आली. गावातील सन्माननिय पालक वर्ग मोठ्या संख्येने शाळेत हजर होता. सन्माननीय अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत पालक सभा घेण्यात आली. तसेच त्यांनी गावात जिथे जिथे विध्यार्थी भेटतील तिथे तिथे त्यांच्याकडून वाचन करून घेतले. अध्यापनाशी आणि ऑनलाईन शिक्षणाशी निगडित प्रश्न विचारले.
गावातील तिन्ही अंगणवाडी केंद्राना सुद्धा भेटी दिल्या. पालकांना आई बाबांची शाळा उपक्रमांतर्गत मार्गदर्शन करण्यात आला. प्रत्येकाला शिक्षकांना वैयक्तिक अडीअडचणी विचारण्यात आल्या. त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.
शाळेत होत असलेल्या रगरंगोटी बदद्ल आणि एकंदरीत सर्व उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापक चोंडे सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यथोचित स्वागत आणि सत्कार केला.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .