मंत्रा कुऱ्हे या विद्यार्थीनीची सागरी भरारी . .शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले कौतूक

शालेयवृत्त सेवा
0

 


पोहण्याची "इंडिया बुक ऑफ रेकार्ड" मध्ये झाली नोंद !


मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

मंत्रा मंगेश  कुऱ्हे या बारा वर्षांच्या मुलीनी एलिफंटा आयलंड ते गेट वे ऑफ इंडिया हे चौदा किलोमीटर सागरी अंतर केवळ दोन तास एकावन्न मिनिटात पोहून पुर्ण पुर्ण केले. या आगळ्यावेगळ्या बालिकेच्या पोहण्याची नोंद "इंडिया बुक ऑफ रेकार्ड" मध्ये केली गेली.


फादर एँग्नल हायस्कूल वाशी येथील शाळेत सातवी इयत्तेत शिकणाऱ्या मंत्रा कुऱ्हे हिने यापुर्वीही राष्ट्रीय पातळीवर पोहण्याचा विक्रम केला आहे. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी मंत्रा कुऱ्हेच्या या यशाबद्दल कौतुक करून तिच्या पुढच्या यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)