मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा 2021 चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षक रत्न पुरस्कार प्रा.विनोद कांबळे यांना प्रदान..

शालेयवृत्त सेवा
0

 



 नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेच्या वतीने आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय गुणीजन  गौरव  महापरिषद  पुरस्कार2021 वितरण सोहळा दिनांक 26 दिनांक 27 सप्टेंबर 2019 ला संपन्न झाला .पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष एड. कृष्णा जगदाळे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध कीर्तनकार केशव महाराज ,जोशी मॅडम, शिंदे मॅडम यांच्या उपस्थितीत आॅनलाइन पुरस्कार प्रदान करण्यात आला . 


महाराष्ट्र राज्यातुन विविध क्षेत्रातून पुरस्कारासाठी निवडलेल्या या मान्यवरांच्या सोहळ्यात माहूर तालुक्यातील सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय अंजनखेड येथील उच्च माध्यमिक विभाग प्रमुख प्रा.विनोद यादवराव कांबळे यांना मानाचा फेटा ,मानकरी बॅच,महावस्त्र, गौरव पदक ,सन्मानचिन्ह व मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय  शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला .


आदिवासी डोंगरी भागात विद्यार्थ्यांचा गुणात्मक संख्यात्मक व सर्वांगीण विकास होण्यासाठी 15 वर्षापासून अविरत मराठी व इतिहास विषयाचे अध्यापन कार्य करीत आहेत .याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवुन त्यांची गुणवत्ता वाढीसाठीचे प्रयत्न सातत्याने करत असतात. यासाठीच या अगोदर महात्मा फुले शिक्षक परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार ,काव्य पुरस्कार ,कला, नृत्य, कथालेखन एकांकिका ,दिग्दर्शन ,अभिनय , सूत्रसंचालन,  क्षेत्रात राज्यस्तरीय घवघवीत यश मिळवले आहे .


पत्रकारिता क्षेत्रातही बहुजन आवाज न्यूज चॅनल प्रतिनिधी म्हणुनआपली छाप निर्माण केली  आहे. न्याय प्राधिकरण सेवा सदस्य ,ग्राहक संरक्षण संघटना जिल्हाध्यक्ष ,अशा अनेक सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संघटनेतुन योगदान दिले आहे .कोरोना काळात विद्यार्थ्यासाठी यूट्यूब चॅनल ,ऑनलाइन शिक्षण ,विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे कार्य अविरतपणे करत आहेत .या पुरस्काराने आणखी समाजहिताचे कार्य करण्याची जबाबदारी वाढल्याचे सांगितले आहे. या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले  याचे श्रेय आपली अर्धांगिनी प्रिया कांबळे भाऊ, बहीण,भाऊजी, आई आणि परिवार यांचे योगदान, आणि प्रेरणा असल्याचे सांगितले .त्यांच्या ह्या पुरस्कारासाठी शिक्षण संस्थेच्या  अध्यक्षा सो.विमलताई खराटे .संस्था सचिव मा. जि. परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य ज्योतिबा खराटे यांनीही कौतुक वअभिनंदन केले.


 याचबरोबर शाळेच्या प्राचार्य जयस्वाल मॅडम पर्यवेक्षक एन .एम .राठोड सर प्रा.डाॅ.राजेद्र लोणे , नगरसेवक दिपक कांबळे ,निरधारी जाधव, ,पुरोगामी शिक्षक संटना अध्यक्ष एस एस पाटील,प्रविण वाघमारे, प्रकाश गायकवाड,मनोज किर्तने, मिलिंद कंधारेसर, प्रा. वैजनाथ जाधव, प्रा.सुंकावार,प्रा. सूर्यवंशी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पावर ऑफ मीडिया चे सर्व पदाधिकारी माहूर, पत्रकारीता सेवा संघ किनवट ,बहुजन आवाज न्युज संपादक विजयकुमार लोंढे, शिक्षक संघटना ,सामाजिक संघटना ,राजकीय नेते मंडळीनी अभिनंदनाचा वर्षाव केला.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)