प्रसिद्ध वारली चित्रकार अनुराधा विजयकुमार गवळी यांना महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार

शालेयवृत्त सेवा
0

 



पुणे ( अयुब शेख ) :

आर्ट बिट्स, पुणे यांचेतर्फे अनुराधा विजयकुमार गवळी यांना महाराष्ट्र कला सन्मान हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.


कलेच्या विश्वात वावरत असताना अनुराधा गवळी यांनी अनेक कला शिकण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या भारतीय कलांनी त्यांना जास्तच भुरळ पाडून त्याचाच अभ्यास करण्याचा प्रयत्न करण्यास भाग पाडले. कधी आपल्या भारतीय प्राचीन कलेकडे त्या वळल्या ते कळलेच नाही. ती कला म्हणजेच फक्त निसर्ग देवतेला पूजन करणारी व मानणारी आदिवासी जमात यांच्या जीवन चरित्रावरील “वारली चित्रशैली”.


जिव्या सोमा म्हसे यांना प्रेरणास्थान मानून त्यांनी सुरु केलेल्या वारली चित्रशैली प्रवासाची वाटचाल सुरु केली. त्यांनी अनेक आदिवासी जमातींचा अभ्यास करून त्यांच्या जीवन चरीत्रावरील चित्र सादर केली आहेत. त्यामध्ये त्यांचे सण, उत्सव, त्यांचे वेगवेगळ्या भागातील राहणीमान व शेती करण्याच्या पद्धती अशा अनेक गोष्टींचा सामावेश आहे.


तसेच सध्या प्रत्येक समाजात भेडसावणाऱ्या समस्या, संपूर्ण जगामध्ये भेडसावणारी प्रत्येक प्रदुषण समस्या, तसेच नुकत्याच थैमान घातलेल्या कोरोनाने लाखो लोकांना विळख्यात घेतल्यामुळे त्यावर मानवाने करावी लागणारी उपाय योजना यांचे अतिशय उद्बोधक असे चित्र वारलीचित्र शैलीतून साकारून पृथ्वीवरील प्रत्येक मानवाला जागरूक करण्याचा संदेश दिला आहे.


अनुराधा गवळी यांच्या या सर्वच कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे यांनी इ. ११ वी चे शारीरिक शिक्षण व आरोग्य या मराठी व इंग्रजी माध्यमाचे पुस्तकावरचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ यावरील चित्रांचे काम अनुराधा गवळी यांच्याकडून केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)