कायदेविषयक जनजागृतीसाठी शिक्षकांनी केले पथनाट्य !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
मा. सर्वोच्च न्यायालयाचे राष्ट्रीय विधी सेवा समिती व मा. उच्च न्यायालयाचे राज्य विधी सेवा समितीच्या निर्देशानुसार व जिल्हा न्यायालयाचे जिल्हा विधी सेवा समितीच्या मार्गदर्शनानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त तालुका विधी सेवा समिती व अभियोक्ता संघ भोकर च्या वतीने कायदेविषयक जागृती अभियान चालू आहे. हे अभियान गांधी जयंती ते बालदिनापर्यंत चालू राहणार आहे.
कायदेविषयक जागृती व्हावी या उद्येशाने दि. १३ रोजीभोकर शहरातील डॉ.आंबेडकर चौकामध्ये पथनाट्याचे सादरीकरण झाले.माता पिता व जेष्ठ नागरीक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ ची माहीती पथनाट्यातून दाखविण्यात आले.
जिल्हा न्यायधिश श्री आर.डी.गाडवे साहेब, दिवाणी न्यायधिश ( वरिष्ठ स्तर ) श्री एम.पी. पांडे साहेब व श्री ए.डी. सूर्यवंशी साहेब, उपविभागीय अधिकारी श्री राजेंद्र खंदारे, तालुका अभियोक्तासंघाचे अध्यक्ष अॅड.बी.डी. कुळकर्णी, गटशिक्षणाधिकारी डॉ.डी.एस. मठपती यांची विशेष उपस्थिती होती.
भोकरच्या शिक्षण विभागातील शिक्षक कलासंचातील मिलिंद जाधव, रंगराव कासराळे, राम शिंदे, संतोष रत्नपारखी, सारीपुत्त चावरे, अशोक पंडित, गणेश करंदीकर, प्रमोद पाटील, सुधांशु कांबळे व सकाळचे बातमीदार तबला वादक बाबुराव पाटील यांनी या पथनाट्याचे सुंदर सादरीकरण करून कायदेविषयक जागृतीसह रसीकांची मने जिंकली.
जेष्ठ नागरीक,व्यापारी वर्ग, वकील मंडळी, न्यायालयीन कर्मचारी, शिक्षक आदी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद जाधव तर आभार अॅड. शिवाजी कदम यांनी मानले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .