असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे
फुला फुलांत येथल्या उदया हसेल गीत हे
मुंबई विशेष प्रतिनिधी (उदय नरे) :
शांता जनार्दन शेळके अर्थात कवयित्री शांताबाई शेळके हे नाव माहिती नसलेला मराठी माणूस विरळाच!.... मराठी माणसांशी जवळचं म्हणजे कुटुंबातील नातं असणाऱ्या एक म्हणजे शांताबाई होत! कारणही तितकेच महत्वाचे आहे. प्रतिभासंपन्न कवयित्री, प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बालसाहित्यिका, पत्रकार, गीतकार अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या शांताबाई आपल्या अलौकिक कार्यकर्तृत्वाने आजही आपल्यामध्ये अस्तित्वाने असतील यात शंकाच नाही.
अनेक लोकप्रिय गीतांच्या रचनेबरोबरच साहित्यसंपदेने समृद्ध असणाऱ्या त्यांच्या नावाची अनेक पिढ्यांना ओळख होत राहिल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे तोलामोलाचे कार्य असल्याने २०२१- २२ हे शांताबाईंचे जन्मशताब्दी वर्ष तितकेच हर्षोल्लासाने आणि कृतज्ञतेने साजरे करताना साहित्यवेडा मराठी माणूस कुठेही कमी पडणार नाही. त्याचाच एक भाग म्हणून " परीसस्पर्श स्वविकासाचा" या उपक्रमाने शांताबाईंना स्वरचित काव्यपुष्पांनी विनम्रपणे आदरांजली एका अनोख्या रुपात वाहिली गेली.
कोरोना आपत्तीच्या खडतर काळात ऑनलाईन स्वरचित काव्यसंमेलनास सहयाद्री वाहिनीच्या सुप्रसिद्ध निवेदिका दीपाली केळकर मॅडम या शांताबाईंच्या कृतज्ञता सोहळ्यास उपस्थित होत्या.परीसस्पर्श स्वविकास' परिवारातर्फे अनेक ईबुक, व्हिडिओ निर्मितीसाठी अथक परिश्रम घेणा-या तंत्रस्नेही आणि या उपक्रमाच्या संचालिका श्रीमती संगिता पाटील मॅडम तसेच परीसस्पर्श शांताईची संकल्पना आणि संयोजिका श्रीम. पूनम राणे मॅडम, सुंदर आणि आकर्षक मुखपृष्ठ कर्ते श्री.अर्जुन माचिवले सर, तंत्रस्नेही भूमिकेतून या उपक्रमात योगदान देणारे श्री. अमोल जाधव सर यांचे तसेच कवी/कवयित्रींनी आपल्या स्वरचित कविता सादर करून तसेच व्हिडिओद्वारे सादरीकरण करून ईबुक तसेच काव्यसंमेलन पूर्णत्वास नेले.
तसेच संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत या ऑनलाईन कार्यक्रमास श्रोतृवृंद उपस्थित राहून साहित्य जननी शांताबाईंविषयी आत्मियतेने दाद देऊन सहभागी झाले. या अनोख्या कार्यक्रमात सहभागी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन संस्थेने केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .