राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणेचा उपक्रम !

शालेयवृत्त सेवा
0

 


 

राज्यातील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन' !


पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :

संपूर्ण जगभर उद्भवलेल्या कोविड-१९ या महामारीच्या काळातही सर्व मुलांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी सर्वत्र प्रयत्न होत आहेत. याचबरोबर राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी नवनवीन उपक्रम तसेच कल्पनांचा वापर करत आहेत. तसेच प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक व अधिकारी प्रयत्न करीत आहेत.

 

त्यांच्या या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांचे नवोपक्रम राज्यातील इतर शिक्षकांपर्यंत पोहोचावेत यासाठी राज्यस्तरावर सन २०२१-२२ साठी नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.



ही स्पर्धा पुढील पाच गटात घेण्यात येणार आहे :

१. पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका

२. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक

३. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक

४. विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती

५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)


त्यानुसार अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांनी http://innovation.scertmaha.ac.in या लिंकवर दि. १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत आपले नवोपक्रम अहवाल सादर करावेत.



नवोपक्रम संदर्भातील अधिक सूचना व निकष याच्या माहितीसाठी स्पर्धेचे माहितीपत्रक https://tinyurl.com/informationletter1 या लिंकवरून डाउनलोड करून अवलोकन करावे.


अधिक माहितीसाठी व शंका असतील तर खालील नंबर वर संपर्क करावा. श्री. सचिन चव्हाण, उपविभाग प्रमुख (संशोधन) 9623027453 श्री.अमोल शिनगारे (विषय सहायक) 9011328892

नवोपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन एम. डी.सिंह , संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)