नांदेड (जी.एस. मंगनाळे) :
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती संघटनेची राज्य कार्यकारी मंडळ सभा राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे .यात विद्यार्थी, शिक्षकांच्या समस्यांवर मंथन होऊन निर्णय घेतले जाणार आहे.दि. 24 आक्टो. 2021 स्थळ :- शिक्षक भवन, 192, नवी पेठ, गांजवे चौक, पत्रकार भवन जवळ, पुणे येथे आहेत.यासाठी संपर्क- राज्य सरचिटणीस हरिश ससनकर यांच्याशी करावे.
सभेत दुपारी 1 ते 4 महत्त्वाचे विषय वर्ग 1 ते 4 चे वर्ग सुरू करणे ,जुनी पेन्शन योजना लागू करणे व डिसीपीएस चा हिशोब देणे,विषय शिक्षक समान काम समान वेतन, 100% विषय शिक्षकांना वेतनश्रेणी देणे.
राज्यातील शिक्षक, के.प्र, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक यांची रिक्त पदे भरणे.शिक्षकांचे पारदर्शी बदली धोरण राबवणे, त्यात 30 जून व 3 वर्ष ही सुधारणा करणे,विधानमंडळात प्राथमिक शिक्षकांना प्रतिनिधित्व देणे,सर्व विद्यार्थी गणवेश व उपस्थिती भत्ता 5 रु देणे.उशिराने वेतन होत आहे, कार्यवाही करणे, पूर्ण ग्रँड पाठवणे व cmp प्रणाली लागू करणे, MSCIT साठी मुदतवाढ देणे, मुख्यालय सक्तीची अट व ग्रामसभा ठराव अट वगळणे.
पदवीधर शिक्षक वेतन तफावत दूर करणे,वेतनासाठी शाईची प्रत अट शिथिल करणे, जि प शाळांचे अनुदान वाढवणे व स्वच्छता वीजबिल साठी अतिरिक्त अनुदान देणे, निवड श्रेणी 20% ची अट वगळणे,सर्व उच्च प्राथमिक शाळांना मुख्याध्यापक पद मंजूर करणे.वर्ग 6 ते 7/8 साठी किमान 3 शिक्षक पद मंजूर करणे व अन्य समस्या चर्चा करून ठराव करण्यात येणार आहे . नांदेडवरुन जी.एस.मंगनाळे राज्य उपाध्यक्ष , बाबुराव माडगे जिल्हा सरचिटणीस नांदेड वरुन निघाले आहेत.अशी माहिती जिल्हा प्रसिद्धीप्रमुख एस. एस .पाटील, सुरेश मोकले यांनी दिली आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .