सांगली ( अस्मा नदाफ ) :
येथील सरोवर शिक्षण मंडळाच्या विविध माध्यमाच्या वतीने महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय फारुख अकिवाटे हे लाभले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून लालबहादूर शास्त्री जयंती, विष्णूअण्णा पाटील जयंती, कर्मवीर भाऊराव पाटील जयंती व डॉक्टर ए .पी. जे .अब्दुल कलाम जयंती अशी एकत्र साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक हाजी मुनीरउद्दिन इमाम मुल्ला यांनी केले.
या कार्यक्रमात कथाकथन स्पर्धेतून प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांनी कथाकथन केले. तसेच वक्तृत्व स्पर्धेतून क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांनी आपले वक्तृत्व कौशल्य दाखवले. यावेळी शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये प्रियांका भोसले, अतिक चौगुले,दत्तात्रय नरळे यांनी सहभाग घेतला.बालचमूंनी नेत्यांची वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय महंमद सरवर मुनीरुद्दिन मुल्ला तसेच ताहेर मुल्ला सर हे लाभले .या कार्यक्रमाचे स्वागत तस्कीन बेपारी व सूत्रसंचालन अश्विनी पाटील यांनी केले.
महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्यासारख्या थोर नेत्यांचा आदर्श समाजाने व विद्यार्थ्यांनी घेतला तर पुढील पिढी आदर्श ठरेल असे मनोगत अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले. विविध उपक्रमांनी हा कार्यक्रम संपन्न झाला. यासाठी संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांनी सहकार्य केले.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .