विद्यार्थी - शिक्षक हजेरीसाठी 'महा स्टुडंट ॲप !

शालेयवृत्त सेवा
0


पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :

शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळा साठी महा स्टुडन्ट ॲप तयार केले आहे त्यानुसार आता विद्यार्थी शिक्षकांची उपस्थिती एका क्‍लिकवर शिक्षण विभागाला करणार आहे.


राज्यात प्रगत शैक्षणिक अभियान अंतर्गत शालेय विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थिती साठी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्यात आली आहे शिक्षणात भारत सरकारने परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स नुसार राज्यातील शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांची हजेरी ऑनलाइन होणार आहे शिक्षण विभागाच्या सरल प्रणालीत परिपूर्ण शालेय डाटा अपडेट करण्यात येतो शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात आदेश जारी केले आहे.


शाळा केंद्र तालुका जिल्हा आणि राज्य पातळीवर विशिष्ट पद्धतीने भरण्यात येणारे विद्यार्थी शिक्षक हजेरी एका क्लिकवर शालेय शिक्षण विभागाला करणार आहे राज्यातील शिक्षकांना याबाबत माहिती भरण्यासाठी महा स्टुडन्ट ॲप डाऊनलोड करण्याच्या सूचना आदेशात देण्यात आल्या आहेत सरल प्रणाली आधार कार्ड अपडेट प्रक्रिया कामकाजात शाळेची परिपूर्ण माहिती घेतली जाते डिजिटल हजेरीने शिक्षण विभाग एका अर्थाने हायटेक झाला आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)