भोकरच्या कन्या शाळेचे मुख्याध्यापक सुधीर सुरंगळीकर यांच्या सेवानिवृतीच्या निमित्ताने..

शालेयवृत्त सेवा
1

 



भोकरच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेत पदोन्नत मुख्याध्यापक व संकुलाचे केंद्रिय मुख्यापक सुधीर सुरंगळीकर हे दि३१ डिसेंबर २०२१ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत होत आहेत. एक शांत ,संयमी व उत्तम मुख्याध्यापक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या शिक्षकी पेशातील कारकिर्द सेवानिवृत्तीच्या निमित्ताने शाळेतील विषय शिक्षक मिलिंद जाधव यांनी मूलाखतीतून  उलगडला. ]     


◼️सर, नमस्कार उद्या आपण सेवा निवृत होत आहात. चौतीस वर्ष शैक्षणिक वर्तुळातील वास्तव्य विद्यार्थी, सहकारी ,शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, अद्यापन, प्रशिक्षणे आदी क्षेत्रापासून दुरावा होणार आहे. एकंदरीत आपल्या आजवरच्या जीवनाचा सारांश  आपल्या बालपणातील आठवणी व आपले शिक्षण यापासून सुरुवात करून सांगा?


- आमचे मुळगाव जालना जिल्ह्यातील  वडील वसंतराव सुरंगळीकर प्राथमिक शिक्षक होते नोकरीच्या निमित्ताने इकडे आले. माझा जन्म २० डिसेंबर १९६३ला उमरखेड येथे झाला. बालपणी वडीलांसोबत आम्ही नोकरीच्या गावातच  राहत होतो. प्राथमिक शिक्षण भोकर तालुक्यातील बेंबर येथे व अर्धापूर तालुक्यातील लोणी बु. येथे झाले. अर्धापूरच्या  माध्यमिक शाळेत असताना आमच्या शाळेतून विविध नाटके आयोजित होत . नाटकात काम करायला आवडायचे कवडीचुंबक, हत्तीगेला शेपूट राहिला, नापासपुरची दिंडी आदी  नाटकांमधून मी  भूमिका केल्या. नांदेड येथे अकरावी विज्ञान व उमरी येथे बारावी विज्ञान परीक्षा उतिर्ण झालो. धर्माबादच्या शासकिय अद्यापक विद्यालयात पत्राद्वारे अध्यापन पदविका तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाची शिक्षणशास्त्र पदवी  नांदेडच्या अद्यापक महाविद्यालयात मिळवली.           


 शिक्षकच का व्हावं वाटलं? शिक्षक म्हणून रुजू झालेल्या पहिल्या शाळेतील दिवस आठवतात का?


- वडील शिक्षक, घरचे वातावरणही शैक्षणिकच होते. अशा वातावरणातून मला एका इंग्रजी शाळेत अप्रशिक्षित शिक्षक म्हणून सेवेस सुरुवात केली . शिक्षक प्रशिक्षिततच पाहिजे म्हणून मला पत्रद्वारा प्रशिक्षणासाठी पाठवलं. पुढे प्रशिक्षित झाल्यावर जिल्हा परिषद सेवेत येण्याची संधी मिळाली.एक जानेवारी १९८८ ही माझी प्रथम नेमणूक दिनांक प्रथम नियुक्ती भोकर तालुक्यात गारगोटवाडी च्या शाळेमधली. गारगोटवाडी गाव कमी लोकसंख्येचे आदिवासी समाज असलेले गाव. मी भोकरहून सायकलवर शाळेला जायचो. विद्यार्थी संख्या जेमतेमच होती. नवीन नियुक्ती चा उत्साह होता . तेथे टेकाळे नावाचे शिक्षक तेथे कार्यरत होते . आम्ही दोघे त्या शाळेत अद्यापन कार्य करत होतो..संख्या कमी असल्यामुळे पुढे काही दिवसातच माझी जवळच्या  शाळेमध्ये व्यवस्था करण्यात आली. जिल्हा परिषद हायस्कूल भोकर , हिमायतनगर, जवळगाव, येथेही अद्यापनाचे कार्य केले.


शिक्षण विभाग पंचायत समिती मध्ये गट समन्वयक कार्य केल्याचा अनुभव..


- शिक्षण विभाग पंचायत समितीमध्ये काम करताना प्रशासनातील कार्यालयीन कामाचा बऱ्यापैकी अनुभव आला त्याचा उपयोग मला मुख्याध्यापक म्हणून काम करताना झाला गट शिक्षणाधिकारी ए.एम. पटेल साहेब ,एन व्ही शिरसाट, एम.डी पाटील, अशोक पाईकराव साहेब तसेच विद्यमान शिक्षण संचालक व भोकरचे  तत्कालीन गटशिक्षण अधिकारी माननीय दिनकर टेमकर साहेब यांच्या अखत्यारीत काम करण्याची संधी मिळाली त्यांच्याकडून बऱ्याच प्रशासकीय बाबी शिकता आल्या.                      


यशस्वी शिक्षक वा मुख्याध्यापकासाठी काय तंत्र वापरावे आपले अनुभव कसे?


- कोणतेही कार्य यशस्वी करण्यासाठी कामातील आवड, एकाग्रता आणि सातत्य असावे लागते. त्यातूनच यश प्राप्ती होते. काम तर करावेच लागते मग या गोष्टीची जोड असेल तर निश्चितच काम सुंदर होते त्यातून मिळणारा आनंदही मोठा असतो.


शिक्षक म्हणून करावा लागणार काम कार्यालयातील कार्यालयीन काम वेगळे व मुख्याध्यापकाचे कार्यवेगळे मुख्याध्यापक म्हणून काम करताना नेतृत्वाचा गुण यासह जबाबदारीची जाणीव असावी लागते तिला पण पुढे सरावात येऊन गेलो अशा प्रकारे कन्या केंद्रीय शाळेवर रुजु झाल्याचा अनुभव सांगता येईल. आपण केलेल्याअद्यापनाविषयी जाणून घ्यायचे आहे !


- शाळेत मराठी इंग्रजी गणित विषय अध्यापन केले .मला भाषा विषयात आवड आहे. या विषयात  विद्यार्थी जास्त रमतात प्रतिसाद देतात त्याच समाधान मिळते.


आधुनिक शिक्षण पद्धत याबद्दल आपले मत..


- आधुनिक शिक्षण पद्धतीत शिक्षकांना अद्यापनेत्तर अवांतर कार्य मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळे शिक्षक विचलित होत आहेत. अवांतर कामे करून शिक्षकांना त्यांना मुक्त वातावरणात शाळेत करण्याची संधी मिळावी. विद्यार्थी प्रमाण जिथे अधिक आहेत, शाळेचा आवाका मोठा आहे अशा शाळेत डाटाऑपरेटर आदी सुविधा असाव्या असे वाटते.


आपण आपण केलेल्या शैक्षणिक व शालेय कार्यावर समाधानी आहात?

- माझी सेवा 34 वर्षांची झाली .माझ्या कार्यात काही उणिवा , त्रुट्या वा दोष असतील  परंतु मी  प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला .कामाची कधीही प्रतारणा केली नाही. म्हणून मी कोण समाधानी आहे.       


सेवानिवृती म्हणजे संपूर्ण कार्यकालात केलेले शैक्षणिक कार्य, अद्यापन,प्रशिक्षण, शाळेशी असलेला लळा यातून होणारी ताटातूट असते. काय सांगाल निवृतीबद्धल व निवृत्ती नंतरचे नियोजन काय असेल?


- निर्धारित केलेल्या वयोमानानुसार निवृत्ती ही अटळ आहे . शिक्षकाची सेवानिवृत्ती अस्वस्थ करणारी व संवेदनशील गोष्ट आहे. सेवा काळात विद्यार्थ्यांची लागलेला लळा, सहकारी शिक्षकांसोबत निर्माण झालेले जिव्हाळ्याचे स्नेह ,पालकांशी जडलेले सौहार्दपूर्ण नाते, यापासून निवृत्त शिक्षक दुरावला जातो. ही बाब शिक्षकास अस्वस्थ करणारे आहे. तशाच माझ्या भावना आहेत.सेवानिवृत्तीनंतर मी वाचनावर भर देणार आहे. जो कार्यकाळात वेळ देता आला नाही.  सामाजिक कार्यातही सहभाग घेणार आहे . शक्य तेवढे  प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचाही प्रयत्न करणार आहे. 


◼️आयुष्यातली चौतीस वर्ष शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात यशस्वी व उत्तम कार्य केलात. शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी आपले कार्य आदर्श आहे. आपल्या भावी आयुष्यासाठी व कार्यासाठी मंगल सदिच्छा.


- मिलिंद जाधव 

 विषय शिक्षक / जि.प. कन्या शाळा भोकर / 9423902454

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा