आता राज्यात 'टीईटी' वर्षातून दोनदा होणार

शालेयवृत्त सेवा
0

 


आगामी परीक्षेपासून परीक्षार्थी ची 'आधार'द्वारे पडताळणी !






पुणे ( शालेय वृत्तसेवा ) : 

जेईई परीक्षेप्रमाणेच आता राज्यात राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे काही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दोनदा 'सीईटी परीक्षा' घेण्यात येणार आहे. हा निर्णय ताजा असतानाच आता शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणारी 'शिक्षक पात्रता परीक्षा देखील (टीईटी) वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे होणाऱ्या टीईटी परीक्षेत विद्यार्थ्यांचे आधार कार्डद्वारे प्रमाणीकरण करून पडताळणी होणार आहे. 



महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने वर्षातून दोनदा टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय तूर्तास केवळ दोन वर्षासाठीच असणार आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत चार टीईटी परीक्षा होणार आहेत, अशी माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्वोच्च न्यायालयाने सर्व आस्थापनांतील कार्यरत इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या निकालानुसार, पाच वर्षे सेवा शिल्लक राहिलेल्या शिक्षकांनाच 'टीईटी' परीक्षेतून वगळले आहे. त्याव्यतिरिक्त सर्व शिक्षकांना ही परीक्षा अनिवार्य असणार आहे.



सर्व शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी  दोन वर्षांची मुदत दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेतर्फे एका वर्षात दोन, अशा दोन वर्षात चार टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहेत. जेणेकरून या परीक्षांच्या माध्यमातून अधिकाधिक शिक्षक टीईटी परीक्षा देऊ शकतील, अशा उद्देशाने परीक्षा वर्षातून दोनदा होणार आहे. २०२५मधील टीईटी परीक्षा रविवारी (ता. २३) होणार आहे. त्यानंतर पुढील परीक्षा सहा महिन्यांनी होणार आहे. त्यानुसार २०२६ मधील पहिली परीक्षा मे-जूनमध्ये घेण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे, असेही डॉ. बेडसे यांनी सांगितले.




गैरप्रकार रोखण्यासाठी यंत्रणा


'टीईटी' परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आता परीक्षार्थीना आधार कार्डाशी जोडले जाणार आहे. परीक्षार्थीच्या आधार कार्डाचे प्रमाणीकरण करून विनष्टान को पडताळणी करण्यात येणार आहे. चाही संत्रणा कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आगामी वर्षात होणाऱ्या टीईटी परीक्षेपासू‌न आधार कार्डाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांच्य अर्जाची पडताळणी करणारी यंत्रणा कार्यान्विर होणार आहे, असे डॉ. नंदकुमार बेडसे यांन सांगितले.



'डिजिलॉकर' होणार उपलब्ध


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी), विविध शिष्यवृत्ती परीक्षा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) यांसह अन्य परीक्षांची प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावीत, यासाठी राज्य परीक्षा परिषदेमार्फत 'डिजिलॉकर'ची सोय उपलब्ध करून दिली जाईल, असेही डॉ. नंदकुमार बेडसे यांनी नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)