समग्र शिक्षा अभियान चा निधी जुलै पूर्वी मिळणार

शालेयवृत्त सेवा
0

 



पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी मान्य !


नांदेड ( एस.एस.पाटील ) :

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळांना दिला जाणारा निधी मागील सत्रात मार्च अखेर देण्यात आला होता त्यामुळे तो खर्ची घालता आला नाही त्यामुळे या सत्रातील निधी जुलै पूर्वी देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने एप्रिल महिन्यात शासनाकडे केली होती. त्याची दखल घेत या सत्रातील निधी खर्च करण्याची लिमिट शाळांना देण्यात आलेली आहे. या निर्णयाचे स्वागत करत संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील व राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहे.

 

    यासह मागील सत्रातील अनेक शाळांचा निधी खर्च न होता शासनास परत गेला होता. तो परत देण्यात यावा अशी सुद्धा संघटनेने मागणी केली होती. यासाठी संघटना पुन्हा शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. यासह गणवेश चा निधी नेहमी उशिरा येतो तो सुद्धा सत्राच्या सुरवातीस देण्यात यावा अशी सुद्धा मागणी केली होती. त्याचीही दखल घेत या वर्षी सत्राच्या सुरुवातीलाच गणवेश चा निधी शाळांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे ही सुद्धा अभिनंदनीय बाब आहे. 


     शाळांच्या देखभाल दुरुस्ती व किरकोळ खर्चासाठी ह्या निधीची नितांत गरज असते त्यामुळे तो सत्राच्या सुरुवातीला मिळाला तर वर्षभर योग्यरितीने व गरजेच्या वेळी उपयोगी पडू शकतो. करिता कोणताही निधी हा सत्राच्या सुरुवातीलाच देण्यात यावा यावर्षी खर्चाची लिमिट जून मधेच देण्यात आलेली आहे. लवकरच निधी सुद्धा शाळांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.अशी माहिती राज्य उपाध्यक्ष जी. एस. मंगनाळे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)