प्रसिध्दी निवेदन :
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS ) इ. ८ वी साठी
परीक्षा दि. १९ जून २०२२
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन रविवार दि. १९ जून २०२२ रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ४९९ केंद्रावर घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण ९२३६ शाळा व एकूण ९३०९४९ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.
परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.in व
https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दि. ०८ जून २०२२ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.
प्रवेशपत्राबाबत मुख्याध्यापकांना/पालकांना/विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी संबंधित परीक्षा
केंद्रसंचालक / शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांचेशी संपर्क साधावा.
कार्यालयाचा पत्ता :
ईमेल
मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, १७, डॉ.
आंबेडकर मार्ग, लाल देवळाजवळ, पुणे- ४११००१.
दुरध्वनी क्रमांक
०२०-२६१२३०६६ /
०२०-२६१२३०६७
nmms.msce@gmail.com
शैलजा दराडे)
22/6/2022
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे-१.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .