उन्हाची तीव्रता लक्षात घेता शाळा सकाळ सत्रात भरविणे बाबत

शालेयवृत्त सेवा
0



विषय: उन्हाची तीव्रता लक्षात घेता शाळा सकाळ सत्रात भरविणे बाबत.

संदर्भ श्री. गोतम टाकळीकर, राज्याध्यक्ष, म.रा. बहुजन शिक्षण महासंघ महाराष्ट्र राज्य, राजगृह निवास,

विक्रम नगर, लातूर यांचे निवेदन क्र.मराबशिम/०३/२०२३ दिनांक २४.०२.२०२३.


उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने फेब्रुवारी २०२३ पासून उन्हाची तीव्रता लक्षात घेता शाळा सकाळ सत्रात भरविणे बाबतचे संदर्भिय निवेदनाची प्रत या कार्यालयास प्राप्त झालेली आहे. सदर निवेदनामध्ये माहे फेब्रुवारी २०२३ पासुनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू नये व विद्यार्थी शिक्षकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेवून शाळा दि. ०१ मार्च २०२३ पासून सकाळाच्या सत्रात भरविण्याबाबत विनंती केलेली आहे. 

सुलभ संदर्भाकरीता संदर्भिय निवेदनाची प्रत या सोबत आपणाकडे पाठविण्यात येत आहे. तरी निवेदनामध्ये नमूद केलेल्या मुद्यांबाबत शासनाच्या प्रचलित नियमानुसार यथानियम कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधीत निवेदनकर्ते यांना आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)