माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

शालेयवृत्त सेवा
0

 

वैज्ञानिक प्रकल्पाचे केले विद्यार्थ्यांनी सादरीकरण



नांदेड ( शरद जोगदंड ) :

माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडी (कंधार फाटा)येथे आज राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी आपल्या  विज्ञान प्रकल्पाचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप गेटकेवार तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक श्री शमशुद्दीन शेख, मुख्याध्यापक श्री आर. डी. राठोड, विज्ञान शिक्षक श्री विजापुरे सर श्री प्रवीण चौडेकर, सौ. जयश्री चौधरी आदी उपस्थित होते.

प्रारंभी भारतरत्न डॉ.सी. व्ही. रामण यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी कु. श्रद्धा इमडे, कु. श्रद्धा तोतरे कु. पायल चव्हाण, शुभम भद्रे या विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध शास्त्रज्ञ तथा नोबल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रामण यांच्या जीवन चरित्रावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला.

 

यावेळी कु. मोहिनी भद्रे, लखन टाळीकोटे या विद्यार्थ्यांनी आवर्तसारणी (पीरियाडिक टेबल) या  प्रकल्पाचे सादरीकरण केले .तिरुपती गवलवाड आणि विश्वजीत डुमने या विद्यार्थ्यांनी एटीएम मशीन या प्रकल्पाचे सादरीकरण केले.तर प्रथमेश चव्हाण या विद्यार्थ्यांने  बॅटरीवर आधारित टेबल लॅम्प तयार केला. ग्रामीण भागात विद्युत पुरवठा खंडित झाला असताना या टेबल लॅम्पचा वापर करून विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल असे सांगितले. सुरज शिवदास कांबळे या विद्यार्थ्यांनी अल्प खर्चात घरगुती वॉटर हिटर तयार करून त्याचे सादरीकरण केले. इयत्ता पाचवीचा विद्यार्थी कुमार तोपरपे यांनी टाकाऊ वस्तु पासून पंख्याच्या साह्याने तरंगणारे जहाज तयार केले. शिवानंद गजगे यांनी आधुनिक पेरणी यंत्र तयार केले तर यश ओमकार याने टेरिस्कोप तयार करून त्याचे सादरीकरण आणि उपयोग सांगितले. 


विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेतील विज्ञान विभाग प्रमुख श्री प्रवीण चौडेकर व सौ.जयश्री चौधरी या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागी करण्याचा प्रयत्न करून त्यांना विज्ञान प्रकल्पसाठी मार्गदर्शन केले. अतिशय कमी वेळात विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने सुंदर विज्ञान प्रकल्प तयार करून त्याचे सर्व विद्यार्थ्यांसमोर सविस्तर अशी माहिती सांगत सादरीकरण केले.

यावेळी विज्ञान शिक्षक श्री प्रवीण चौडेकर, श्री विजापूरे सर सौ. जयश्री चौधरी, श्री यशवंत बोडके, श्री संजय श्रीरामे या विज्ञान शिक्षकांचा मुख्याध्यापक श्री संदीप गेटकेवार यांनी पुष्प देऊन सन्मान केला.

कार्यक्रमास  शिवाजीराव अंबुलगेकर, राजकुमार मेहरकर, गितेश्वर मोरे, संगम मठपती, संदीप गुंटूरकर, सुधाकर पाटील, आरती लिंगनवाड मॅडम, श्री मरशीवणे सर, सिद्धार्थ कांबळे, पंडित श्रीरामे, किरण विराळे, धोंडीबा पवार, स्वप्निल गोपतवाड, विठ्ठलराव केंद्रे, विलास बादेवाड, तानाजी घोगरे, संदीप परकंटे, संदीप कोरे, श्री विलास इंगोले श्री राकेश महालिंगे आदिसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)