लोणी शाळेतील चिमुकल्यांनी " वृक्षदिंडी " काढून वृक्षसंवर्धनासाठी केली जनजागृती..

शालेयवृत्त सेवा
0



आषाढी एकादशी निमित्त जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :                                   

कमठाला केंद्रातर्गत असलेली जिल्हा परिषद प्राथमिक लोणी शाळेत आषाढी एकादशी निमित्त ' वृक्षदिंडी ' काढण्यात आली. विठ्ठल - रुखमाईच्या वेशभुषेत आणि वारकऱ्यांच्या वेशभुषेत सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 


टाळ - मृदंगाच्या सोबतीने दिंडीला सुरवात झाली. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात वृक्षरोप होते. गावाच्या प्रमुख मार्गाने दिंडी निघाली. दोन ठिकाणी रिंगन करून जीवनात वृक्षांचे महत्च सांगण्यात आले. 'झाडे लावू - झाडे जगऊ - पर्यावरण वाचऊ ' , 'चला ऑक्सिजन पेरुया ' शेताच्या बांधावर, घराच्या अंगणात, रस्त्याच्या कडेला, शाळेच्या परिसरात झाडे लावण्याविषयी जनजागृती करण्यात आली. गावकऱ्यांनी ठिकठिकाणी वृक्षदिंडीचे स्वागत केले.


यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन लोंढे आणि माता - पालक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक रमेश मुनेश्वर, उपक्रमशील शिक्षिका विद्या श्रीमेवार, पदवीधर शिक्षक अंकुश राऊत, तंत्रस्नेही शिक्षक राहूल तामगाडगे आणि अगंनवाडी सेविका शोभा गेडाम, नंदा सावरकर, राजू तलांडे, यांनी विशेष परिश्रम घेतले. आनंददाई वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)